आजोबा भाजीपाला आणायला जात असताना नातू मागून धावत आला, मग...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

आजोबा आणि नातू अंगनात बसले होते. घरी भाजीपाला नसल्याने सुनेने सासऱ्यांना पाठविले. सासऱ्यांनी नातूला दरवाज्यापर्यंत सोडून भाजीपाला आणण्यासाठी निघून गेले. मात्र, नातू आजोबांच्या मागे गेला. नाल्याजवळून जात असताना काठावरून पाय घसरून पडला. नाका व तोडांत पाणी गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

नागपूर : दोन वर्षीय चिमुकला खेळताना नाल्यात पडला. नाल्यातील पाणी नाकातोंडात गेल्यामुळे चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना एमआयडीसी परीसरात उघडकीस आली. अंशू सोहनलाल खुद्दान असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहनलाल खुद्दान हे वानाडोंगरी नगरपरिषद येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. ते जगताप ले-आउटमध्ये पत्नी, आईवडील आणि बहिणीसह राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून, त्यांना दोन वर्षांचा मुलगा (अंशू) होता. त्यांच्या घराच्या अगदी बाजूला 15 फूट खोल नाला आहे. 

रविवारी सायंकाळी अंशू आणि त्याचे आजोबा अंगनात बसले होते. दरम्यान सुनेने बाजारातून भाजीपाला आणायला सासऱ्यांना पाठवले. बाहरे खेळत असलेल्या अंशूला आजोबाने घराच्या दरवाज्यापर्यंत सोडले आणि बाजारात निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ अशू बाहेर धावत आला. बाहेर खेळताना तो नाल्याच्या काठावर गेला. काठावरून त्याचा पाय घसरला आणि नाल्याच्या पाण्यात पडला.

असे का घडले? - कोणी सांगेल का? माझी काय चूक होती...

अंशूचा रडण्याचा आवाज आल्यामुळे त्याची आई, आजी आणि आत्या धावत बाहेर आली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नाल्यातील पाणी नाका-तोंडात गेल्यामुळे अंशूचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy's death in a drain at Nagpur