भाऊ आला बहिणीला भेटायला अन्‌ रात्री घडली ही घटना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मे 2020

रात्री दीडच्या सुमारास अचानक वादळवारा सुटला. विजांचा कडकडाट झाला. पावसाने जोरदार हजेरी लावली. बेड्यावरचे लोक बाहेरच झोपले होते. दरम्यान, अंगावर वीज पडल्याने खुल्या आभाळाखाली झोपलेले खिमजी वेरशी खामलया यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

चांपा (जि. नागपूर) : बहिणीला भेटायला आलेल्या भावाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कुही तालुक्‍यातील लांजाळा गावानजीकच्या शेतात घडली. गुजरात येथील खिमजी वेरशी खामलया (वय 38, रा. पद्धर, ता. बुच, जि. कच्छ, गुजरात) असे मृत भावाचे नाव आहे. 
मृत खिमजी खामलया हे भावासह ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत होते. 
गुजरातवरून महाराष्ट्रात गावोगावी भटकंती करून शेळ्या-मेंढ्या चराईसाठी आलेल्या मेंढीवाल्यांच्या बेड्यावर दोघे भाऊ आले होते. अहमदाबाद येथे औषधे न्यायची असल्याने ते बुधवारी टाटा वाहनाने नागपूरला आले होते. बहीण सजीबेल विसाभाई रबारी ह्या कुही तालुक्‍यातील लांजाळा गावानजीकच्या शेतात मेंढपाळांच्या बेड्यावर असल्याचे माहीत होताच दोघेही भाऊ भेटण्यास आले. बहिणीची भेट घेतली. रात्री जेवणखावण झाले. दोघेही भाऊ बेड्यावरच झोपले. मात्र ती रात्र एका भावासाठी काळरात्र बनून आली. 

हेही वाचा : कोरोनामुळे गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर गंडांतर 

रात्री दीडच्या सुमारास अचानक वादळवारा सुटला. विजांचा कडकडाट झाला. पावसाने जोरदार हजेरी लावली. बेड्यावरचे लोक बाहेरच झोपले होते. दरम्यान, अंगावर वीज पडल्याने खुल्या आभाळाखाली झोपलेले खिमजी वेरशी खामलया यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. फिर्यादी नागझी वेरशी खामलया यांच्या तक्रारीवरून कुही पोलिसांनी घटनेची नोंद केली. पोलिस निरीक्षक पंजाबराव परघने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के, हवालदार दिलीप लांजेवार, पवन सावरकर, पंकज बुटले पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother came to meet sister and...