गोलमाल है भाई सब गोलमाल है

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

शनिवारी दुपारी उमरेड आगाराच्या बसने तो काटोलहून बसला. बसवाहक संध्या पेनफोडे यांनी सूर्यवंशीकडे पास मागितली. पास समोरून अगदी सामान्य असली तरी मागची बाजू कोरी असल्याने त्यांना शंका आली. पास जवळच ठेवून सूर्यवंशीला गणेशपेठ स्थानकावर आणण्यात आले.

नागपूर : विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी असलेला शिक्षकच बनावट त्रैमासिक पासवर प्रवास करीत एसटी महामंडळाचे महसूल बुडवित होता. शनिवारी त्याची बनवेगिरी उघडकीस आली. एसटीच्या अधिकाऱ्यांनी या शिक्षकाला थेट पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

हे वाचाच - शिरी-फरहाद, हिर-रांझा, सलीम-अनारकली आणि...

संजय सूर्यवंशी (55) बालाजीनगर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो काटोल येथील खासगी शाळेत शिक्षक आहे. त्रैमासिक पासद्वारे त्याचा दैनंदिन प्रवास सुरू होता. शनिवारी दुपारी उमरेड आगाराच्या बसने तो काटोलहून बसला. बसवाहक संध्या पेनफोडे यांनी सूर्यवंशीकडे पास मागितली. पास समोरून अगदी सामान्य असली तरी मागची बाजू कोरी असल्याने त्यांना शंका आली. पास जवळच ठेवून सूर्यवंशीला गणेशपेठ स्थानकावर आणण्यात आले. सूर्यवंशीला सोबत घेऊनच संध्या या वाहतूक नियंत्रक दीपक तामगाडगे यांच्याकडे गेल्या. पास बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शिक्षकाला गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सूर्यवंशीकडे एकूण 8 पास मिळाल्या असून त्यावर नागपूर-काटोल-नागपूर आणि नागपूर-जलालखेडा असा उल्लेख आहे. वर्षभरापासून या बनावट पासवरूनच प्रवास करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोऱ्या पासच्या रंगीत कागदावर झेरॉक्‍स प्रती काढून घेतल्या असून त्यावर हाताने नाव लिहून त्याचा हा प्रवास सुरू होता. एसटीच्या छापील पासवर दोन्ही बाजूने मजकूर असतो. पण, त्याच्याकडील पासवर मागच्या भागात कोणताही मजकूर नसल्याने हा बनाव उघडकीस आला. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brothers are all confused