दीड लाख कोटींची ‘दिवाळी‘ 

राजेश रामपूरकर
Monday, 19 October 2020

नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत एका महिन्यात एक लाख कोटी रुपयाची गृहोपयोगी वस्तू, वाहन, सोन्याची विक्री होणार आहे. ४० ते ५० हजार कोटी रुपयांचे घर, जमीन खरेदी, तर ४० हजार कोटींची उलाढाल दिवाळीला लागणारे लाइटिंग, विजेचे विविध प्रकारचे बल्ब, सजावटी मेणबत्ती, आकाश कंदील, सजावटी सामान, रांगोळी आणि शुभ लाभाचे चिन्ह, भेट देण्यासाठी लागणारे साहित्य, पूजेचे साहित्य, मातीच्या मुरत्या आणि अनेक भारतीय कारागिरांना तयार केले साहित्यांचा समावेश आहे

नागपूर :  कोरोनाच्या काळातील मंदीनंतर बाजारात पुन्हा ग्राहकांची वर्दळ वाढू लागल्याने उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीपर्यंत बाजारात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता असून सुमारे दीड लाख कोटींचा व्यापार होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नोकरदार वर्गाच्या खर्चावर कोरोनाच्या काळात नियंत्रण आले. त्यामुळे त्यांच्या बचत खात्यात रक्कम शिल्लक आहे. सणासुदीच्या निमित्ताने नोकरदार मोठ्या प्रमाणात खरेदी करतील, असे अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. 

नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत एका महिन्यात एक लाख कोटी रुपयाची गृहोपयोगी वस्तू, वाहन, सोन्याची विक्री होणार आहे. ४० ते ५० हजार कोटी रुपयांचे घर, जमीन खरेदी, तर ४० हजार कोटींची उलाढाल दिवाळीला लागणारे लाइटिंग, विजेचे विविध प्रकारचे बल्ब, सजावटी मेणबत्ती, आकाश कंदील, सजावटी सामान, रांगोळी आणि शुभ लाभाचे चिन्ह, भेट देण्यासाठी लागणारे साहित्य, पूजेचे साहित्य, मातीच्या मुरत्या आणि अनेक भारतीय कारागिरांना तयार केले साहित्यांचा समावेश आहे. या उत्पादनांची ऑनलाईन, सोशल मिडिया आणि व्हर्चअल प्रदर्शनातून यांची विक्री केली जाणार आहे. ही संपूर्ण उलाढाल ३१ मार्च २०२१ पर्यंत दोन लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे. 

संजय राठोड म्हणाले, वाघासाठी वन कर्मचाऱ्याला पिंजऱ्यात ठेवल्याची माहिती चुकीची; डॉट मारण्यासाठी आटापीटा

दिवाळीत सराफा बाजारात उत्साह असेल कारण उन्हाळ्यात न झालेली लग्न आणि डिसेंबर महिन्यात होणारे लग्न असा डबल धमाका लक्षात घेता यंदा या व्यवसायाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. देशात सोन्याची आयात कमी झालेली असली तरी यंदा दिवाळीला ७० ते ८० टक्के सोन्‍याची खरेदी होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची ९० हजार कोटी किमतीच्या वस्तूची विक्री होईल. ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष मितेश मोदी म्हणाले, दिवाळीत गेल्यावर्षीच्या तुलनेत टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, टॅब, वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर, फुडप्रोससरसह इतरही वस्तूंची २० ते ३० टक्के अधिकची विक्री होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. 

 

दोन लाख कोटींची उलाढाल 

नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत एका महिन्यात एक लाख कोटी रुपयाची गृहोपयोगी वस्तू, वाहन, सोन्याची विक्री होणार आहे. ४० ते ५० हजार कोटी रुपयांचे घर, जमीन खरेदी, तर ४० हजार कोटींची उलाढाल दिवाळीला लागणारे लाइटिंग, विजेचे विविध प्रकारचे साहित्यांची ३१ मार्च २०२१ पर्य्ंत दोन लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. बी.सी. भरतीया,  अखिल भारतीय व्यापारी महासंघ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAIT Hope Big Business in Diwali Season