पात्रता आणि विद्यापीठ परीक्षा एकत्र कशा घेणार ?

मंगेश गोमासे
Monday, 28 September 2020

राज्यभरात विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे ठरविण्यात आल्यात. विशेष म्हणजे राज्यातील विविध स्पर्धात्मक परीक्षा घेण्याचे काम करणारी सीईटी सेल याच विभागाच्या अधिपत्याखाली काम करते. असे असताना दोन्ही परीक्षेचे वेळापत्रक ठरविताना समन्वय असणे गरजेचे आहे. मात्र, समन्वयाच्या अभावाने सीईटी सेलद्वारे ११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेण्याचे ठरविले.

नागपूर ः राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा १ ते १९ ऑक्टोंबरदरम्यान घेण्यात येणार आहेत. मात्र, दरम्यान राज्याच्या सीईटी सेलमार्फत ११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेशासाठी सीईटीचे आयोजन केले आहे. राज्यातील विद्यापीठे आणि सीईटी सेल यांच्यात समन्वयाच्या अभावामुळेच विविध परीक्षांचे वेळापत्रक सारख्या तारखांवर येत असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे नेमकी कोणती परीक्षा द्यावी असा संभ्रम विद्यार्थ्यांचा मनात निर्माण झाला आहे.

राज्यभरात विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे ठरविण्यात आल्यात. विशेष म्हणजे राज्यातील विविध स्पर्धात्मक परीक्षा घेण्याचे काम करणारी सीईटी सेल याच विभागाच्या अधिपत्याखाली काम करते. असे असताना दोन्ही परीक्षेचे वेळापत्रक ठरविताना समन्वय असणे गरजेचे आहे. मात्र, समन्वयाच्या अभावाने सीईटी सेलद्वारे ११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेण्याचे ठरविले.

नागपूर विद्यापीठ सुरू करणार लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम; वर्ग, नोट्स, परीक्षा सर्वकाही एकाच प्लॅटफॉर्मवर    

११ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन चाचणीनंतर १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान फील्ड टेस्ट घेण्यात येईल. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना या दोन परीक्षेपैकी कोणतीही पैकी एक परीक्षा घ्यावी लागणार आहे. नागपुरातून दरवर्षी सुमारे 2 हजार विद्यार्थी या परीक्षेत बसतात. विदर्भात ही संख्या मोठी आहे. यामुळे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाने सीईटी सेल आयुक्त आणि शिक्षणमंत्र्यांना पत्रही लिहून सीईटी रद्द करण्याची मागणी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CET cell and University Examinations How to get together?