मुलाला मोबाईल खेळायला देणे वडिलांना भोवले; ऐनीडेस्कच्या माध्यामातून नऊ लाखांची फसवणूक

cheated by nine lakhs in rural Nagpur
cheated by nine lakhs in rural Nagpur

नागपूर : ऑनलाईन फ्रॉड आता काही नवीन नाही. रोज नवीन नवीन घटना वृत्तपत्रात वाचायला मिळतात. मात्र, याचा कुणाच्या जिवनावर कोणताच परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना नागपुरातील कोराडी भागात घडली. ॲप डाउनलोड करताच वडिलांच्या खात्यातून आठ लाख ९५ हजार रुपये दुसऱ्याने स्वत:च्या खात्यात वळते केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार नोव्हेंबरला धीरजजवळ असलेल्या मोबाइलवर राजेश शर्मा याने संपर्क साधला. वडिलांच्या नावे असलेल्या फोन पेच्या खात्यात क्रेडिट लिमिट वाढवून देण्याचे आमिष त्याने धीरजला दिले. राजेश याने धीरज याला मोबाइलमध्ये ऐनीडेस्क नावाचा ॲप डाउनलोड करायला लावला. ॲप डाउनलोड करताच धीरज याच्या वडिलांच्या खात्यातून आठ लाख ९५ हजार रुपये राजेश याने स्वत:च्या खात्यात वळते केले.

देशात ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणात मोठी वाढ होत आहे. ज्या वेगात डिजिटल पेमेंट वाढतंय, त्याच वेगात ऑनलाईन फ्रॉडची प्रकरणंही वाढत आहेत. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक ऑनलाईन फसवणूकीचं एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. नागपुरातील कोराडीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून अज्ञाताने 9 लाख रुपये चोरी केले आहेत. यासाठी वापरण्यात आलेल्या प्रक्रियेने सर्वच जण हैराण आहेत.

नागपूरच्या कोराडीमध्ये अशोक मनवते आपल्या कुटुंबासोबत राहतात. बुधवारी १५ वर्षांचा मुलगा धीरज त्यांचा मोबाईल वापरत होता. त्यावेळी एक कॉल आला. समोरच्या व्यक्तीने फोन पेच्या कस्टमर केअरचा अधिकारी बोलत असल्याचे धीरजला सांगितले. धीरजने प्रतिसाद देताच डीजिटल पेमेंट अकाउंटचे क्रेडिट लिमिट वाढवायचे असल्याचे सांगितले.

त्याच्या प्रलोभनाला बळी पळत कॉलवरील व्यक्तीने जसे जसे सांगितले तसे तसे धीरजने केले. राजेश शर्मा याने धीरजला ऐनीडेस्क नावाचा ॲप डाउनलोड करायला लावला. धीरजने ॲप डाउनलोड करताच शर्माने अशोक यांच्या खात्यातून आठ लाख ९५ हजार रुपये आपल्या खात्यात वळते केले. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सतर्क राहण्याचे आवाहन

पोलिसांकडून या प्रकरणात आयटी ॲक्टअंतर्गतही रिपोर्ट लिहिण्यात आला आहे. अशाप्रकारचे प्रकरण समोर आल्यानंतर लोकांना ऑनलाईन फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com