घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

मंगेश बेले 
Monday, 9 November 2020

हा प्रकार उपस्थितांच्या लक्षात आला. तातडीने महिलेस नागपुरात हलविण्यात आले. त्या महिलेची प्रकृती आता उत्तम असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

बल्लारपूर (चंद्रपूर) : ‘देव तारी, त्याला कोण मारी' अशी एक म्हण आहे. या म्हणीप्रमाणेच एक घटना बल्लारपुरातील गणपती वॉर्डात घडली. छातीत दुखू लागल्याने एका महिलेस चंद्रपुरातील एका खासगी डॉक्‍टरकडे दाखल केले. उपचाराअंती डॉक्‍टराने त्या महिलेस मृत घोषित केले. अंत्यसंस्कारची तयारी सुरू झाली. तेव्हा महिलेच्या शरीराच्या हालचाली सुरू झाल्या. 

हा प्रकार उपस्थितांच्या लक्षात आला. तातडीने महिलेस नागपुरात हलविण्यात आले. त्या महिलेची प्रकृती आता उत्तम असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

शहरातील गणपती वॉर्डात भारती मराठे राहतात. नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अशी त्यांची ओळख आहे. शनिवारी (ता. ७) दुपारच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे तपासणीसाठी चंद्रपूर शहरातील एका खासगी डॉक्‍टरांकडे त्यांना आणण्यात आले. डॉक्‍टरांनी उपचाराअंती भारती मराठे यांना मृत घोषित केले. डॉक्‍टरांच्या सांगण्यावरून भारतीचा मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबीयांनी आप्तस्वकीयांना बोलावून घेतले. 

घरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. मात्र, रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक या महिलेचे हात पाय हलल्याचे काही उपस्थितांच्या निदर्शनास आले. त्यामुळे महिलेस पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. आता भारती मराठे यांची प्रकृती उत्तम असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. मात्र, घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहेत.

भरती मराठे या पोस्टाच्या एजंट आहेत. नेहमीप्रमाणे आरडीचे पैसे गोळा करायला त्या निघाल्या. मात्र, अचानक छातीत दुखण्याच्या त्रास उद्‌भवल्यामुळे त्यांना चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासणी केली असता महिलेचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना कळवले.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

ही दुःखद बातमी कळताच भारती मराठे यांच्या बहिणीची प्रकृती बिघडली. त्यामुळे उपचारासाठी तिलासुद्धा रुग्णालयात नेण्यात आले. आता प्रकृती ठिक असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. भारती मराठे यांचीही प्रकृती उत्तम असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman who was no more suddenly woke up in Chandrapur