बापाने सोडले.. आईने टाकले... पण यांनी दिला अन्न आणि निवारा 

मनीषा मोहोड-येरखेडे
बुधवार, 10 जून 2020

आता त्यांना ना आई आहे ना बाबा... कोण त्यांची देखभाल करणार... कोण काळजी घेणार... यांचे काय भविष्य असेल... असे भलेमोठे अवघड प्रश्न समोर आ वासून उभे आहे. 

नागपूर : माय-बाप नसलेल्या पाच भावंडांच्या नशिबी अनाथांचे जिणे आले आहे. त्यांची देखभाल कोण करणार... कोण काळजी घेणार... यांचे काय भविष्य असेल... असे अवघड प्रश्न समोर आ वासून उभे असतांनाच जिल्हा महिला बाल विकास विभागाने या मुलांच्या अन्न व निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.
उमरेड तालुक्‍यातील कुही येथील पारधी कुटुंबातील 2 ते 11 वर्षांची पाच भावंड आई वडील सोडून गेल्याने, निराधार झाली होती. या पाच भावंडांना जिल्हा चाईल्ड लाइनच्या माध्यमातून शासकीय अनाथालयात हलविण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात काही समाजसेवी संस्था पारधी पाड्यावर अन्न धान्य किट वाटपासाठी गेल्या असता, येथील भयाण वास्तव समोर आले. एका संवेदनशील युवकाने या निराधार भावंडांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. संबधित व्हिडीओ महिला बाल कल्याण अधिकारी अर्पणा कोल्हे यांनी पाहिला. त्यांनी आपल्या चाईल्ड लाईनच्या टिमला तातडीने पाचही भावंडांना शासकीय आधार गृहात आणण्याचे निर्देश दिलेत. केवळ दोन ते अकरा वर्षे वयोगटातील या बालकांचे वडील वारले. त्यानंतर आई आणि आजी यांच्यात रोज वाद होत होता. एक दिवस वाद विकोपाला गेल्याने, आईनेही या मुलांना आजी व काकाच्या अंगावर ढकलून पळ काढला.
आई बाप दोघेही सोडून गेल्यावर आजी व काकाने या मुलांना अनेक दिवस उपाशी ठेवले. नीट खायला न मिळाल्याने, मरणासन्न अवस्थेत असलेल्या या मुलांचा व्हिडीओ चाईल्ड लाईनच्या टिमला मिळाला. त्यांनी तातडीने सर्व मुलांना आपल्या ताब्यात घेत शासकीय निवारा गृहात भरती करून, त्यांची व्यवस्था केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारच्या अनेक केसेस चाईल्ड लाईनच्या टिमकडे आल्या आहेत. यात नातेवाईकांकडून होत असलेले लैंगिक शोषण, बालविवाह, आरोग्यविषयक, पोषण आहार अशा एक ना अनेक समस्या जिल्हा चाईल्ड लाईनच्या समुहाने या काळात सोडविल्याचे चाईल्ड लाईनच्या समन्वयकांनी सांगितले.
उच्चभ्रु कुटुंबातील मुलं फेकले कचऱ्यात
अकोला रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळी आपल्या आई जवळ झोपलेल्या अवघ्या 14 महिन्याच्या गोडसं मुलाला एका मुले चोरणाऱ्या महिलेने उचलले. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडून तिने मुलाला घेऊन, नागपूर गाठले. नागपूरला रामझुल्या खाली असलेल्या काही झोपड्यामध्ये संबधित महिला त्या मुलासह काही दिवस राहिली. मुलाला कडेवर घेऊन भिक मागुन ती आपली गुजराण करीत होती. काही दिवसांनी लॉकडाऊन झाले. खायला काही मिळत नसल्याने, या मुलाला तेथेच सोडून महिलेने पळ काढला. शहरातील बापुजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या संचालक रेखा बारहाते व देविशा दहीकर या दोघींनी या मुलाला रेस्क्‍यू करून, शासकीय बालगृहात दाखल केले. शासकीय तपास यंत्रणेने या बालकाच्या पालकांचा शोध लावला असून, बालक अकोला येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

 सविस्तर वाचा - पार्टीत पोहोचला कोरोना रुग्ण अन् नागपूरच्या या परिसरातील ७०० जणांना झाला घात

उच्चभ्रु कुटुंबातील मुलं फेकल कचऱ्यात 
अकोला रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळी आपल्या आई जवळ झोपलेल्या अवघ्या 14 महिन्याच्या गोडसं मुलाला एका मुल चोरणाऱ्या महिलेने उचलले. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडून तिने मुलाला घेऊन, नागपूर गाढले. नागपूरला रामझुल्या खाली असलेल्या काही झोपड्यामध्ये संबधित महिला त्या मुलालासह काही दिवस राहीली. मुलाला कडेवर घेऊन भिक मागुन ती आपली गुजरान करीत होती. परंतु, काही दिवसांनी लॉकडाऊन झाले. खायला काही मिळत नसल्याने, या मुलाला तेथेच सोडून महिलेने पळ काढला. शहरातील बापुजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या संचालक रेखा बारहाते व देविशा दहीकर या दोघींनी या मुलाला रेस्कू करून, शासकीय बालगृहात दाखल केले. शासकीय तपास यंत्रणेने या बालकाच्या पालकांचा शोध लावला असून, बालक अकोला येथील असल्याची माहीती समोर आली आहे. 

दोन बालविवाह रोखण्यात यश 
गेल्या दोन महिन्यात बालसंरक्षण कायद्याअंतर्गंत अनेक कॉल 1098 या चाईल्ड लाईनच्या हेल्पलाईन कडे आले आहेत. यात लैंगिक शोषण, बालविवाह, मानवतस्करी सारख्या घटना उघडकीस आल्या आहेत. सर्व प्रकरणात कायदेशीर कारवाई करून, मुलांना शासकीय निवारा गृहात दाखल केले आहे. तर, दोन बालविवाह रोखण्यातही आम्हाला यश आले आहे. दरम्यान, या काळात मुलांच्या पोषण आहाराचा प्रश्‍न गंभीर झाल्याने, शहरातील विविध सामाजिक संस्थेच्या मदतीने शेकडो अन्न धान्याच्या कीट वितरीत केल्या आहेत. 
मुश्‍ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, नागपूर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child line helps to orphans