वडिलांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेला मुलाचीच साक्ष

The child's testimony to the punishment of his father's forced labor
The child's testimony to the punishment of his father's forced labor

नागपूर : पैसा आणि संपत्ती माणसाला राक्षस बनवते. संपत्तीच्या लोभापायी एका नवऱ्याने चक्‍क आपल्या पत्नीलाच पेटवून दिल्याची घटना घडली आणि या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदर होता त्यांचाच पोटचा मुलगा.
मुलाच्या साक्षीने वडिलांना जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. कृष्णराव संपतराव रघटाटे (52, रा. झेंडा चौक, सोमलवाडा) असे आरोपी वडिलांचे नाव आहे.

कृष्णराव यांनी स्वतःची पत्नी वनिता कृष्णराव रघटाटे यांना संपत्तीच्या वादातून अंगावर पेट्रोल टाकून पेटविले होते. मेडिकल हॉस्पिटलमध्ये वनिता यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोपी कृष्णराव याला सोनेगाव पोलिसांनी 25 नोव्हेंबर 2016 रोजी अटक केली होती. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाने 5 साक्षीदार तपासले. यामध्ये आरोपीचा मुलगा हिमांशू याची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयामध्ये सर्व घटना हिंमाशूने पोलिसांना दिलेल्या जबाबाप्रमाणे कथन केली. मात्र, उलट तपासणीदरम्यान जबाब फिरवत वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे सरकारी पक्षाने त्याला फितूर घोषित करून उलट तपासणी केली. याशिवाय वनिता यांनी मृत्यूपूर्वी आपला जबाब विशेष न्याय दंडाधिकारी यांच्यासह पोलिसांना दिला होता. या सर्व बाबींची सखोलपणे मांडणी करून आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपी कृष्णराव याला कलम 302 नुसार दहा वर्षांची शिक्षा, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिन्यांची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणामध्ये पोलिस उपनिरीक्षक राहुल शेजव यांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. सरकारी पक्षातर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली. तर, आरोपीतर्फे ऍड. पी. ए. देवतळे, ऍड. एस. के. मोहिले यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com