दत्तात्रयनगरात दुहेरी हत्याकांड, मामा भाचीची हत्या,पोलीस घटनास्थळी दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

किल्लीने घर उघडलं तेव्हा समोरच्या खोलीत मामा (अशोक काटे) मृतावस्थेत पडलेले होते, तर मनीषा ह्या आताच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आल्या. मृतक अशोक काटे हे मनिषा यांचे मामा असून ते काही दिवसांसाठी मनिषा यांच्याकडे राहायला आले होते. मृतक मनीषा यांचे पती जयंतराव नाटेकर हे बेपत्ता आहेत.

नागपूर : दत्तात्रेयनगर येथील निवासी मनिषा नाटेकर आणि त्यांचे मामा अशोक काटे हे त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याने परीसरात खळबळ माजली आहे.

अशोक काटे मनिषा यांच्या घरी काही दिवसांपासून राहायला आलेले होते.
मनीषा नाटेकर या भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्यांना सुजय नावाचा विवाहित मुलगा आहे. तो पुण्याला तिथे नोकरी करतो.
मनीषा नाटेकर यांचे घर बाहेरून लॉक होते. त्या शनिवारी शाळेत गेल्या होत्या, रविवारी सुट्टी असल्याने घरीच होत्या ..त्यानंतर सोमवारी शेवटच्या शेजारच्यांना दिसल्या,मात्र त्यांनंतर त्या दिसल्या नाहीत.

सविस्तर वाचा - मेट्रोत प्रवासी संख्येचा आलेख उंचावला, एका दिवसात 17 हजार नागरिकांचा प्रवास
ललित रारोकर हे त्याच शाळेत शिक्षक आहेत,ते तीन दिवस सुट्टीवर होते,त्यांनी सुट्टी साठी मनीषा नाटेकर यांना फोन केला पण त्यांनी फोन घेतलाच नाही..सलग दोन दिवस त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने ललित यांनी मनीषा नाटेकर यांच्या भावाला फोन केला. भाऊ राजीव खनगन हे मनीषा यांच्या घरी आले तेव्हा घर बाहेरून बंद होते, त्यांच्याकडे दुसरी किल्ली असते,त्यांनी किल्लीने घर उघडलं तेव्हा समोरच्या खोलीत मामा (अशोक काटे) मृतावस्थेत पडलेले होते, तर मनीषा ह्या आताच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आल्या. मृतक अशोक काटे हे मनिषा यांचे मामा असून ते काही दिवसांसाठी मनिषा यांच्याकडे राहायला आले होते. मृतक मनीषा यांचे पती जयंतराव नाटेकर हे बेपत्ता आहेत. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Double murder in Nagpur