esakal | हे काय, तुकाराम मुंढे यांच्या घरावर धडकले नागरिक, काय असेल कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Citizens hit Commissioner Tukaram Mundhe's house

नगरसेवक व नागरिकांनी आयुक्तांच्या घरापुढे ठाण मांडले. यावेळी नागरिकांनी घोषणाबाजीही केली. तीन दिवसांपासून नळ जोडणी बंद केल्याने नागरिकांची दुर्दशा सुरू आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतरही तोडगा निघाला नाही, असे नगरसेविका रूपाली ठाकूर यांनी सांगितले.

हे काय, तुकाराम मुंढे यांच्या घरावर धडकले नागरिक, काय असेल कारण...

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : कुठलीही कल्पना न देता पाणी बिल न भरल्याने महापालिकेने नळ जोडणी रद्द केली. यामुळे संतप्त नागरिकांनी रविवारी दुपारी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निवासस्थानी धडक दिली. पाण्यासाठी आलेल्या या नागरिकांना आयुक्तांनी पोलिस स्टेशन दाखविल्याने नागरिक आणखीच संतापले आहेत. नगरसेवक अभय गोटेकर, नगरसेविका रूपाली ठाकूर, भाजपचे शहर उपाध्यक्ष परशू ठाकूर यांच्यासह शेकडो नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

विश्वकर्मानगरातील म्हाडा कॉलनीतील पाणी बिलाचा वाद सुरू आहे. म्हाडाने येथील घरांचे पाणीबिल न भरल्याने पन्नासावर घरांमधील नळजोडणी महापालिकेने बंद केली. नागरिकांकडे पाणी न आल्याने खळबळ माजली. नागरिकांनी थेट नगरसेवक अभय गोटेकर, नगरसेविका रूपाली ठाकूर यांच्याकडे धाव घेतली. नगरसेवकांनी भाजप शहर उपाध्यक्ष परशू ठाकूर व शेकडो नागरिकांसह दुपारी थेट महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सिव्हिल लाइन्स येथील निवासस्थानी धाव घेतली. अचानक नागरिकांच्या मोर्चामुळे आयुक्तांच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांतही खळबळ माजली.

जाणून घ्या - विश्वास बसेल का? आधीच्या काळात पुरुषही घालायचे जोडवे, कारण वाचून बसेल धक्का...

नगरसेवक व नागरिकांनी आयुक्तांच्या घरापुढे ठाण मांडले. यावेळी नागरिकांनी घोषणाबाजीही केली. तीन दिवसांपासून नळ जोडणी बंद केल्याने नागरिकांची दुर्दशा सुरू आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतरही तोडगा निघाला नाही, असे नगरसेविका रूपाली ठाकूर यांनी सांगितले. नागरिकांना बिल भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत अधिकाऱ्यांकडे मागितली. त्यांनी होकारही दिला, परंतु आश्वासन न पाळता अधिकाऱ्यांनी नळजोडणी बंद केल्याचे नगरसेवक अभय गोटेकर यांनी नमुद केले. 

आयुक्तांनी नागरिकांचे समाधान न करता त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. सिताबर्डी पोलिसांनी नगरसेवक अभय गोटेकर, नगरसेविका रूपाली ठाकूर, भाजपचे शहर उपाध्यक्ष परशू ठाकूर यांच्यासह संतापलेल्या नागरिकांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन तीन दिवस कोठडीत ठेवावे, परंतु नागरिकांना पाणी द्यावे, अशी मागणी गोटेकर यांनी केली. जोपर्यंत नळ सुरू होणार नाही, तोपर्यंत परत जाणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने आंदोलन चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

क्लिक करा -  पतीने स्वतःच्याच पत्नीला केली ही विचित्र मागणी...अखेर कंटाळलेल्या पत्नीची पोलिसात धाव.. वाचा काय आहे संपूर्ण प्रकार...

पाणी दरवाढीविरुद्ध आंदोलनाची तयारी

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्चमध्ये पाण्याच्या दरात पाच टक्के वाढीचा निर्णय घेतला. कोरोनाच्या काळात नागरिकांपुढे आर्थिक संकट असताना पाणी दरवाढ अन्यायकारक असल्याचे नमुद करीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविरोधात नागपूर विकास परिषदेने १० ऑगस्टला संविधान चौकात आंदोलनाची तयारी केली आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे