का दणाणली उपराजधानी?...वाचा

योगेश बरवड
रविवार, 12 जुलै 2020

चुकीचे वीजबिल रद्द करा, लॉकडाऊनच्या काळातील 300 युनिटपर्यंतचे बिल माफ करा, वीजरदवाढ वर्षभरासाठी रद्द करा, बिलात आकारले जाणारे अधिभार, व्याज रद्द करा आदी मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या. 

नागपूर : सर्वसामान्यांना पाठविण्यात आलेल्या भरमसाठ वीजबिलाविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी नगाडा बजाओ आंदोलन करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी नगाडे बडविण्यात आल्याने उपराजधानी दणाणली. वाढीव वीजबिलाविरोधातील भाजपाचे हे सहावे शहरव्यापी आंदोलन ठरले. 

भाजपाचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, महापौर संदीप जोशी, आमदार गिरिश व्यास, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार क्रष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते आदींनी वेगवेगळ्या ठिकाणच्या आंदोलनांचे नेतृत्व केले. 

चुकीचे वीजबिल रद्द करा, लॉकडाऊनच्या काळातील 300 युनिटपर्यंतचे बिल माफ करा, वीजरदवाढ वर्षभरासाठी रद्द करा, बिलात आकारले जाणारे अधिभार, व्याज रद्द करा आदी मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या. 

हेही वाचा : अकरावी प्रवेशासाठी काय करताहेत पालक ! 

गोळीबार चौकात प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. स्वत: दटके यांनी नगाडा बडवीत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमध्ये दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद असतानाही वारेमाप बिल आलेच, कसे असा प्रश्‍न उपस्थित करीत दटके यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

ग्राहकांना मनमान्यापद्धतीने अवास्तव वीजबिल पाठविण्याचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी रचले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ग्राहकांनी वीजमाफीची मागणी करताच राज्य सरकार केंद्राकडे उंगलीनिर्देश करते. सर्वच बाबींची प्रतीपूर्ती केंद्रालाच करायचे असेल तर राज्य सरकार करतेतरी काय, असाही सवाल दटके यांनी केला. 

व्हेरायटी चौकात युवा मोर्चातर्फे शिवाणी दाणी यांच्या नेतृत्वात गोलीबार चौकात विनकर आघाडीचे संयोजक श्‍याम चांदेकर, लॉ कॉलेज चौकात शिक्षक सेलतर्फे कल्पना पांडे यांच्या नेतृत्वात, कमाल चौकात प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम, अवस्थी चौकात अजय पाठक, गिट्टीखदान चौकात माया इवनाते व आदिवासी मोर्चेचे अध्यक्ष शेखर येटी यांच्या नेतृत्वात, नंदनवन चौकात रमेश वानखेडे, दोसर भवन चौकात लाला कुरैशी, शाहिद चौकात संजय वाधवानी, बैद्यनाथ चौकात जयसिंग कछवाह, प्रतापनगर चौकात भोलनाथ सहारे, कॉटन मार्किट चौकात राम कोरपे, पुंडलिक सावंत, सक्करदरा चौकात डॉ. संभाजी भोसले, पीयूष अम्बूलकर, गड्डीगोदाम चौकात विकास फ्रांसिस, रामनगर चौकात पी. एस. एन. मूर्ती,संदीप पिल्ले, संविधान चौकात ऍड. नचिकेत व्यास यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. शहरातील सर्व आमदारांसह मनपातील सत्ता पक्ष नेता संदीप जाधव, अशोक मेंढे, किशोर पलांदुरकर, विनोद कन्हेरे, संजय अवचट, देवेन दस्तूरे, संजय चौधरी, भोजराज डुम्बे, संजय ठाकरे, संजय बंगाले, राम अम्बूलकर, सुनील मित्रा आदींनी वेगवेगळ्या ठिकाणच्या आंदोलन स्थळी भेट देऊन विचार मांडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: city sputtering but why?