
दरवर्षी दहावीला १७ लाख तर १२ विला १५ लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेत बसतात. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नागपूर : राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांबाबत अद्याप माहिता समोर आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम असून तो तत्काळ दूर करण्याच्या मागणीचे निवेदन भाजपा शिक्षक आघाडीच्या राज्य संयोजक डॉ कल्पना पांडे, डॉ उल्हास फडके व पूर्व विदर्भ संयोजक अनिल महादेवराव शिवणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविले आहे.
दरवर्षी दहावीला १७ लाख तर १२ विला १५ लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेत बसतात. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, त्या परीक्षा कधी होणार ? अभ्यासक्रम किती असणार ? पेपर पॅटर्न कोणता असणार? जुनाच की नविन? तोंडी व लेखी गुणांचे प्रमाण काय असणार? अभ्यासक्रम कमी झाल्यामुळे मूल्यमापन, गुणदान किती आणि कसे असणार?
हेही वाचा - चंद्रपुरातील घुग्गुसचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार; नगर परिषद स्थापन करण्याची मागणी;...
तसेच परीक्षा ऑॅफलाइन की ऑॅनलाइन? गुणदान तक्त्याचे नियोजन कसे असणार? आणखी अभ्यासक्रम कमी करणार आहे की नाही? परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावली की जुन्याच पध्दतीची प्रश्नपत्रिका असणार? त्या अनुषंगाने शिक्षकांचे प्रशिक्षण होणार किंवा नाही? अजुन वेळापत्रक का प्रसिध्द करण्यात आले नाही? असे अनेक प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात आहेत.
त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे यावर शिक्षण विभागाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हा संयोजक प्रदीप बिबटे, मेघशाम झंजाळ, कैलास कुरंजेकर, लिलेश्वर बोरकर, स्वरूप तारगे, अरुण रहांगडाले, गुरुदास कामडी, मनोहर बारस्कर, अरुण पारधी, रंजीव श्रीरामवार, सचिन काळबांडे, रजनीकांत बोंदरे, मोहन मोहिते यांनी केली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ