कॉक्‍लियर इन्प्लान्टची किंमत कमी होईल : नितीन गडकरी

Cochlear implants cost down: Nitin Gadkari
Cochlear implants cost down: Nitin Gadkari

नागपूर : मध्य भारतातील आर्थिकदृष्ट्या मागास कर्णबधिर मुलांवर कॉक्‍लियर इन्प्लान्ट सेवा देणारी मेयो आणि मेडिकल ही दोन वैद्यकीय महाविद्यालय आहेत. मात्र, लाखोंचा खर्च असल्याने हे उपचार गरिबांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. कॉक्‍लियर इन्प्लान्ट परदेशातून मागवले जातात. हे डिव्हाईस सध्या भारतात तयार केले जात असून, यावरील उपचाराचा खर्च तब्बल 50 टक्‍क्‍यांनी कमी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. देशभरात पाच मेडिकल डिव्हाईस पार्क सुरू करण्यात येतील, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केला.

असोसिएशन ऑफ ऑटोलरिगोलॉजिस्टिक (एओआयसीओएन-2020) या कान-नाक-घसा रोगतज्ज्ञांच्या परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. सिव्हिल लाइन येथील चिटणवीस सेंटरमध्ये सुरू असलेल्या परिषदेत नागपूरचे महापौर संदीप जोशी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासह संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. सत्यप्रकाश दुबे, डॉ. कौसल सेठ, डॉ. संजय अग्रवाल, ज्येष्ठ कान-नाक-घसा रोगतज्ज्ञ डॉ. मदन कापरे, डॉ. देवेंद्र माहुरे, डॉ. समीर चौधरी, डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. नंदू कोलवाडकर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, कॉक्‍लियर इन्प्लाट डिव्हाईसची 50 टक्के किंमत कमी झाल्यास गरिबांसाठी ते वरदान ठरणार आहे. विशेष म्हणजे, खासगी रुग्णसेवा गरिबांच्या आवाक्‍यात नाही. यामुळे डॉक्‍टरांनी जे पैसा खर्च करू शकतात त्यांच्याकडून पैसे घ्यावे, परंतु सामाजिक दायित्व समजून गरिबांना सेवा द्यावी. ग्रामीण भाग शहरांसोबत जोडण्याचा कार्यक्रम सुरू असून, 16 हजार गावांमधील रस्ते पूर्ण होत असून, ते शहरांसोबत जोडण्यात आले आहेत. पैसा जीवनाचे साधन आहे, ते साध्य नाही, असे सांगत समाजासाठी निरपेक्ष भावनेने काम करा, असे अवाहन गडकरी यांनी केले.

यावेळी डॉ. कृष्णकांत भार्गव यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर मेळघाटमधील 300 आदिवासींवर थायराईडची शस्त्रक्रिया करणारे डॉ. मदन कापरे आणि डॉ. संजय अग्रवाल यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. ईएनटी परिषदेत विदेशातून उपस्थित झालेले डॉ. ग्रेगरी रॅन्डोल्ट, डॉ. नील टोली (अमेरिका), डॉ. रॉबर्ट व्हिन्सेंट (फ्रान्स), डॉ. सॅबॅस्टियन हॅक स्टूटगार्ट (जर्मनी), डॉ. मेझीन अल खबुरी (ओमान), डॉ. सॅन्टदीप पॉन (यूके) यांचा गौरव करण्यात आला. डॉ. संजय तत्त्ववादी आणि डॉ. निधी कापरे यांनी संचालन केले.

बाल श्रवण योजना
राज्यात मोठ्या प्रमाणात कर्णबधिर मुलांची संख्या आहे. ही बाब लक्षात घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बाल श्रवण योजनेसंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. ती योजना सुरू होईल, असे संकेत यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com