जिल्हाधिकारी कार्यालय; एकाचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांसह ५० कर्मचारी पॉझिटिव्ह

नीलेश डोये
Wednesday, 16 September 2020

नझूल, भूसंपादन, तहसील कार्यालयातही अनेक जण बाधित झाले. परंतु विभाग बंद ठेवून सॅनिटाईज करण्यात आले नाही. जिल्हाधिकारी बाधित झाल्यानंतर त्यांचा विभाग बंद ठेवून सॅनिटाईज करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडून दुजाभाव मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

नागपूर  : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून सरकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. त्यामुळे मृत्यूंचा आकडा वाढतो आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा कोरोनोने विळखा घातला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरेसह ५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची लागण झाली असून आज एका शिपायाचा मृत्यू झाला. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लॉकडाउनच्या काळापासून महसूल विभागाची यंत्रणा कामावर आहे. कोरोना काळात त्यांच्या सुट्या सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. शासकीय सुट्यांच्या दिवशी सुद्धा कामावर होते. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर कार्यालयात येणाऱ्यांची गर्दी वाढली. येथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उभी करण्यात आली. त्यामुळे याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे. गेल्या दीड-दोन महिन्यात ५० अधिकारी, कर्मचारी बाधित झाले.

लॉकडाउनवरून प्रशासनात दोन गट, वाचा सविस्तर

यात  उपजिल्हाधिकारी, तहसिलदारांचाही समावेश आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता काही दिवस कार्यालय बंद ठेवण्याचा मागणी कर्मचाऱ्यांची आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी ती धुडकावून लावली. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या विभागातील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना लागण झाली. नझूल, भूसंपादन, तहसील कार्यालयातही अनेक जण बाधित झाले. परंतु विभाग बंद ठेवून सॅनिटाईज करण्यात आले नाही. जिल्हाधिकारी बाधित झाल्यानंतर त्यांचा विभाग बंद ठेवून सॅनिटाईज करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडून दुजाभाव मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. काहींनी तर नोकरीवरून काढून टाकले तरी काही दिवस कार्यालयात न येण्याचे बोलून दाखविले.

अतिमहत्त्वाच्या कामासाठीच यावे
अनेकांना कोरोनाची लागण आला आहे. अतिमहत्त्वाचे काम असेल तरच नागरिकांनी कार्यालय यावे. अन्यथा फोन किंवा ऑनलाइन संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector's Office Death of one; 50 employees including the Collector are positive