पैसे भरा नंतरच मिळतील कागदपत्रं; शासनाकडून प्रतिपूर्ती मिळाली नसल्यानं महाविद्यालयांची विद्यार्थ्यांकडे मागणी 

Colleges asking for money for giving documents to students
Colleges asking for money for giving documents to students
Updated on

नागपूर, : गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्याना सरकारकडून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही प्रतिपूर्ती मिळाली नसल्याने ते पैसे विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यासाठी शहरातील काही नामवंत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरून पैसे भरल्याशिवाय महाविद्यालय सोडल्याचा दाखला व मूळ पदवी देण्यासही नकार दिला आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे.

राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची सन २०१८-१९ आणि २०१९-२० ची शिष्यवृत्ती रखडल्याने महाविद्यालयांची शुल्कप्रतिपूर्ती झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालयांची विद्यार्थ्यांची अडवणूक करण्याचा प्रकार सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑगस्टमध्ये तर निकाल सप्टेंबर महिन्यात जाहीर झाला. 

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर गुणपत्रिका मिळाल्याने महाविद्यालयाला ती अडवता आली नाही. मात्र, महाविद्यालय सोडल्याचा दाखला आणि मूळ पदवी प्रमाणपत्र देण्यास महाविद्यालये नकार देत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थी महाविद्यालयांकडे महाविद्यालय सोडल्याचा दाखला मागण्यास गेले तर त्यांना नकार दिला जात आहे. 

शिष्यवृत्ती न मिळाल्याने ‘‘आधी थकित शिक्षण शुल्क भरा नंतरच कागदपत्रे मागा’, असे सांगून त्यांना वाटेला लावले जात आहे. शैक्षणिक शुल्क भरण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने आणि सरकार शिष्यवृत्ती केव्हा जमा करील, याचा अंदाज नसल्याने विद्यार्थी हतबल आहेत. त्यांना पदव्युत्तर प्रवेशाची चिंता आहे. यासंदर्भात रायसोनी अभियांत्रिकीचे संचालक डॉ. सचिन उंटावले यांना विचारणा केली असता त्यांनी अशी कुठल्याही विद्यार्थ्यांची तक्रार आमच्याकडे नसून, ज्या विद्यार्थ्यांनी सांगितले त्यांना आमच्याकडे येऊन आपली कागदपत्रे घेऊन जावे असे सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com