आयुक्त व पदाधिकाऱ्यांत अधिकाऱ्यांचे 'सॅंडविच'!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

महापालिकेत स्थायी समिती, दुर्बल घटक, परिवहनसह तेरा विशेष समित्या आहेत. दररोज कुठल्या ना कुठल्या समितीची बैठक पालिकेत होत आहे. विशेष म्हणजे समिती सभापतीकडून विविध उपक्रम, योजना, बांधकाम, कर आदीचा आढावा समितीच्या बैठकीतून घेतला जातो. या बैठकीत संबंधित विभाग प्रमुख, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्तांची उपस्थिती बंधनकारक आहे.

नागपूर : महापालिकेच्या विषय समिती बैठकीत अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक आहे. मात्र, आयुक्तांनी अधिकाऱ्यांना मोबाईलऐवजी कक्षातील फोनवर संपर्क करण्यात येईल, असे सांगितल्याचे सुत्राने नमुद केले. आयुक्तांनी कक्षात फोन केला अन्‌ उचलला नाही तर कारवाई होईल, या भीतीने अधिकाऱ्यांपुढे आता विषय समितीच्या बैठकीत कसे जावे असा प्रश्‍न उभा झाला आहे. विषय समितीच्या बैठकीत न गेल्यास पदाधिकाऱ्यांचीही नाराजी सहन करावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे पुरते 'सॅंडविच' झाल्याची चर्चा आहे.

अवश्य वाचा - रात्रीच्या अंधारात ते भेटले आणि....

महापालिकेत स्थायी समिती, दुर्बल घटक, परिवहनसह तेरा विशेष समित्या आहेत. दररोज कुठल्या ना कुठल्या समितीची बैठक पालिकेत होत आहे. विशेष म्हणजे समिती सभापतीकडून विविध उपक्रम, योजना, बांधकाम, कर आदीचा आढावा समितीच्या बैठकीतून घेतला जातो. या बैठकीत संबंधित विभाग प्रमुख, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्तांची उपस्थिती बंधनकारक आहे. एवढेच नव्हे अनेकदा सभापतींकडून अधिकाऱ्यांना जाबही विचारला जातो, उपयुक्त निर्देश दिले जाते. आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षातील फोन सुरू करण्याबाबत व काही कामानिमित्त त्यावरच संवाद करण्याचे निर्देश दिल्याचे सुत्राने नमूद केले. एखादवेळी समितीच्या बैठकीला अधिकारी उपस्थित असतानाच आयुक्तांनी कक्षात फोन केल्यास काय करावे? अशा प्रश्‍नाने अधिकारी त्रस्त झाले आहे. अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आयुक्त कारवाई तर करणार नाही? अशी भीती अधिकाऱ्यांत आहे. एकीकडे आयुक्तांची भीती तर दुसरीकडे समिती बैठकीत न गेल्यास समिती सभापतींचीही नाराजी, अशा दुहेरी संकटात अधिकारी अडकले आहे. एवढेच नव्हे तर आयुक्तांनी समितीच्या बैठकीपूर्वी संबंधित विषयाची फाईलही मागितल्याचे सुत्राने सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांची घाबरगुंडी उडाली आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner and office bearers 'sandwich'!