तुकाराम मुंढे सकाळी सकाळी डम्पिंग ग्राउंडवर, अधिका-यांना झाड झाड झाडले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

आज त्यांनी थेट नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डवर भेट देऊन पाहणी केली. तेथील अव्यवस्था पाहून त्यांनी नारजी व्यक्‍त केली. त्यांनी कचऱ्याचे मोजमाप यंत्र तपासले. कचऱ्याचे विलगीकरण न दिल्याने आरोग्य अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्‍त आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचा धडाका सुरू केला आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता आयुक्‍तांनी थेट भांडेवाडी डम्पिंग यार्ड गाठले. तेथील कचऱ्याची पाहणी केली. ओला आणि सुका कचऱ्याचा एकच ढीग आल्याचे पाहून आयुक्‍त संतापले. त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्‍त केली. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी तंबीही त्यांनी दिली.

पदभार हाती घेताच आयुक्‍तांनी स्वच्छतेचा मुद्दा उचलून धरला. स्चछतेच्या बाबतीत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी बैठकीत आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले होते. नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करायला सांगून त्याचच उचल करा, असेही त्यांनी वारंवार सांगितले होते. आज त्यांनी थेट नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डवर भेट देऊन पाहणी केली. तेथील अव्यवस्था पाहून त्यांनी नारजी व्यक्‍त केली. त्यांनी कचऱ्याचे मोजमाप यंत्र तपासले. कचऱ्याचे विलगीकरण न दिल्याने आरोग्य अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.

देवलापारात या, झाडाला हात लावा, रोग बरा होतो, म्हणे देवी प्रगटली

कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कपड्यापासून तर दाढीपर्यंत शिस्त लावणे सुरू केले आहे. गेल्या काहीच दिवसांत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीला मनपातील अधिकारी व कर्मचारी कंटाळले आहेत. त्यांच्यापासून सुटका कशी करावी याचा विचार कर्मचारी करीत असून, एकमेकांना फोन लावणे सुरू असल्याचे समजते. नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुकाराम मुंढेंनी चार कर्मचाऱ्यांना दणका दिला होता. कामात अनियमितता आढळल्याने लेखा आणि वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे निर्देश, तुकाराम मुंढे यांनी दिले होते. तुकाराम मुंढे यांनी रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लेखा आणि वित्त विभागाची पाहणी केली होती.

 

अधिकारी, कर्मचारी कंटाळले

तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाची पद्धत कशी आहे? त्यावर कशी मात केली? असे प्रश्‍न मनपातील कर्मचारी व अधिकारी नाशिक मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारत आहेत. यावरून गेल्या काही दिवसांत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीला मनपातील अधिकारी, कर्मचारी कंटाळल्याचे चित्र आहे.
 

कर्मचाऱ्यांसाठी नियमांचं पत्रक

नागपूर : कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अनेक चुकीच्या बाबी मार्गावर आणण्याचा विडा उचलला असतानाच, महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वळण लावण्याचा प्रयत्न मुंढेंनी सुरू केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner of Nagpur Municipal Commissioner reached the dumping yard in morning.