"देवला'पारात या, झाडाला हात लावा, रोग बरा होतो, म्हणे देवी प्रगटली

वसंत डामरे
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

तालुक्‍यातील आदिवासीबहुल भागातील खरपडा, सिंदेवानी, बोथिया पालोरा या गावांमधून मोहाच्या झाडांमधून देवी निघाली, अशी अफवा पसरविण्यात आली. मोहाच्या झाडाच्या बुंध्याला मग शेंदूर फासण्यात आला. झाडाला हात लावला की हात वर उचलला जातो. झाडाला कवटाळले की रोग नाहीसा होतो, असेही काही "भक्तां'कडून सांगितले जाते.

रामटेक (जि.नागपूर)  : तालुक्‍याच्या सिंदेवानी, खरपडा, बोथिया पालोरा या गावांतून मोहाच्या झाडातून देवी प्रगटल्याची अफवा अत्यंत वेगाने पसरली. एका गावात तीन दिवसच ही देवी राहते. देवीच्या झाडाला कवटाळले की रोग बरा होतो, अशीही अफवा पसरविल्या जात असून साधा भोळा आदिवासी समाज या अंधश्रद्धेला बळी पडतो आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांनी ही अफवा असल्याचे सांगून जागृती करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी हाणून पाडला आहे.
 

क्‍लिक करा  : वादळांना शांत करण्याच्या प्रयत्नांचा प्रयोग

देवीच्या "भक्‍तां'ची जमली मांदियाळी
तालुक्‍यातील आदिवासीबहुल भागातील खरपडा, सिंदेवानी, बोथिया पालोरा या गावांमधून मोहाच्या झाडांमधून देवी निघाली, अशी अफवा पसरविण्यात आली. मोहाच्या झाडाच्या बुंध्याला मग शेंदूर फासण्यात आला. झाडाला हात लावला की हात वर उचलला जातो. झाडाला कवटाळले की रोग नाहीसा होतो, असेही काही "भक्तां'कडून सांगितले जाते. या अफवेला बळी पडून या झाडांजवळ देवीच्या दर्शनासाठी व रोग नाहीसा करण्यासाठी लोकांची गर्दी उसळू लागली. मग हळूच झाडाजवळ "दान पेटीही' आली. एका गावात ही देवी फक्त तीन दिवस मुक्काम करून देवी मग दुसऱ्या गावातील मोहाच्या झाडातून प्रगटते, अशाप्रकारे कोणीतरी खोडसाळपणा करून समाजातील साध्या भोळ्या जनतेला अंधश्रद्धेचे बळी ठरवित आहे.

क्‍लिक करा  : तुमच्याही घरावर आहे ना, मुलीच्या नावाची पाटी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी या गावातील देवीच्या "प्रगटस्थळाला' भेट देऊन लोकांना ही अंधश्रद्धा असल्याचे सांगून अशा अफवांना बळी पडू नका, असे आवाहन केले. मात्र, लोकांनी त्यांच्याशीच वाद घालून ही बाब खरी असल्याचे सांगितले. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Come to Devala, touch the tree, the disease is cured," said the goddess