Video : 'या' भाजप उमेदवारावर गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

दटके यांच्या विरोधात 2006 सालच्या फौजदारी प्रकरणात कलम 181,182, 200 नुसार गुन्हा दाखल आहे. यावर नागपूर येथील जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. मात्र, विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती लपविल्याचा आरोप ऍड. उके यांनी केला आहे.

नागपूर : राज्यातील विधान परिषद निवडणूक कोरोनाच्या संकटामुळे रखडली होती. अखेर राजकीय पक्षांच्या पाठपुराव्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवाराने निवडणूक आयोगापासून गुन्ह्यांची माहिती लपवल्याची दावा करण्यात आला आहे. 

 

 

भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार प्रवीण दटके यांच्या विरोधात नागपुरातील वकील सतीश उके यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. दटके यांनी त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती आपल्या निवडणूक अर्जामध्ये लपविल्याचा आरोप ऍड. सतीश उके यांनी केला आहे. 

अखेर नागपूर जिल्ह्यातील तळीरामांची झाली सोय, अशी असेल मद्य विक्रीची व्यवस्था

दटके यांच्या विरोधात 2006 सालच्या फौजदारी प्रकरणात कलम 181,182, 200 नुसार गुन्हा दाखल आहे. यावर नागपूर येथील जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. मात्र, विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती लपविल्याचा आरोप ऍड. उके यांनी केला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 125 (अ) नुसार कारवाई करण्यात यावी, अशी विनंती ऍड. सतीश उके यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे. तसेच, त्यांचा अर्ज रद्द करून निवडणूक प्रमाणपत्र देऊ नये, अशी देखील विनंती त्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: complaint to election commission against bjp candidate