नितीन गडकरींच्या घरासमोर कॉंग्रेसचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

भाजपचे मंगळवारी वीज दरवाढीच्या विरोधात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भीख मांगो आंदोलन करण्यात आले होते. यास इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करून कॉंग्रेसतर्फे प्रत्युत्तर देण्यात आले.

नागपूर  : मोदी, शहा, गडकरी यांचे मुखवटे परिधान करून कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात भीख मांगो आंदोलन करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील घराजवळच्या चौकात वाहनचालकांना भीक मागून इंधनाच्या दरवाढीकडे लक्ष वेधण्यात आले. 

भाजपचे मंगळवारी वीज दरवाढीच्या विरोधात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भीख मांगो आंदोलन करण्यात आले होते. यास इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करून कॉंग्रेसतर्फे प्रत्युत्तर देण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांचे मुखवटे घालून व हातात टोपल्या घालून भीक मागितली. एवढेच नव्हे, तर चौकात सायकल रिक्षा उभी करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 
आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे महासचिव प्रफुल्ल गुडधे, मनपातील कॉंग्रसचे गटनेते तानाजी वनवे, नगरसेवक किशोर जिचकार, मनोज गावंडे, जुल्फीकार भुट्टो, नरेंद्र जिचकार यांनी केले. 

हेही वाचा : स्लॅबच्या कामादरम्यान दहाव्या माळ्यावरून पडला मजूर आणि... 

आंदोलनात प्रणीत मोहोडे, नीरज देशमुख, मुकेश शर्मा, गुड्डू गुडधे, प्रकाश चावरे, रशीद भाई, सधन यादव गौतम गाणार, आशीष बालपांडे, अमित भोयर, अभिषेक राऊत, पंकज टेंभूर्णी, रोशन वराडकर, प्रशांत भोयर, प्रज्वल भोयर, नगरसेविका प्रणिता शहाणे, सुनीता जिचकार, मीना कटरे, नंदा देशमुख आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress agitation against petrol, diesel price hike