"मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही; वाराणसीत जाऊन लढण्याची ताकत माझ्यात आहे" 

टीम ई सकाळ 
Saturday, 16 January 2021

दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. मात्र केंद्र सरकार शेतकऱयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच आज नागपुरात राजभवनावर काँग्रेसनं आंदोलन केलं.

नागपूर : देशात शेतकरी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही काहीच मार्ग निघत नाहीये. मात्र आता केंद्र सरकारच्या आडमुठेपणावर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी आज नागपुरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपवर टीका केली आहे. 

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. मात्र केंद्र सरकार शेतकऱयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच आज नागपुरात राजभवनावर काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार बाळू धानोरकर यांनी मोदींचा ट्रम्प करू असं विधान केलंय.  

काय म्हणाले बाळू धानोरकर 

ज्या पद्धतीने अमेरिकेतून ट्रम्प हद्दपार झाला, त्याचप्र्रमाणे मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही. बाळू धानोरकर महाराष्ट्रातला एकमेव खासदार नाही. पक्षाने फक्त आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन लढायची ताकत माझ्यामध्ये आहे. आता तीन वर्ष बाकी आहेत. जर मोदींचा ट्रम्प केला नाही तर नावाचा बाळू धानोरकर नाही, असं ते म्हणाले.

अधिक माहितीसाठी - मन सुन्न करणारं वास्तव! जीवाचं रान करून वाढवलेल्या जीवांना खड्ड्यात पुरण्याची आली वेळ

काही जण नशिबानं मोठे झाले 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे प्रचारक आहेत. गुजरात मुख्यमंत्री झाले ते साधे आमदारही नव्हते. त्यानंतर ते ३ वेळा मुख्यमंत्री झाले. मात्र माणूस हा कर्तृत्वानं मोठा होतो. काही लोकं नशिबानं मोठे झाले आहेत. मी कुठल्याही पक्षात असलो तरी लोक आणि कार्यकर्ते माझ्या मागे उभे आहेत असंही धानोरकर म्हणाले. 
 
संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MP Balu Dhanorkar criticized PM Narendra Modi in Nagpur