नागपूर जि. प.वर कॉंग्रेस-राकॉं आघाडीचा झेंडा? भाजपला झटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीने मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांत बहुतांश ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. काटोल, नरखेड, सामनेर, कळमेश्वर, उमरेड या तालुक्‍यात आघाडीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीने मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांत बहुतांश ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. काटोल, नरखेड, सामनेर, कळमेश्वर, उमरेड या तालुक्‍यात आघाडीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे.

अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी मेंटपांजरा सर्कलमधून विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे प्रवीण आडकीने यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश बंग यांचे पुत्र दिनेश यांनी रायपूर जिल्हा परिषद सर्कल मधून विजय मिळवला आहे. त्यांनी कॉंग्रेसचे बाबा आष्टणकर यांचा पराभव केला. कॉंग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे हे केळवदमधून विजयी झाले. कॉंग्रेसचे नाना कंभाले यांनी कोराडीमधून विजय मिळविला. माजी मंत्री चंदशेखर बावनकुळे हे कोराडीचे रहिवाशी आहेत, हे विशेष.

शिवसेनेला मोठा धक्का
भाजपच्या बबिता गजबे नरखेड तालुक्‍यातील बेलोना सर्कलमधून अटीतटीच्या लढतीत विजयी झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी धक्का मानला जात आहे. भाजपने पाच जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा - बावनकुळे म्हणतात, वडेट्टीवारांचे भाजपमध्ये स्वागतच आहे
 

- कवठा पंचायत समितीमधून कॉंग्रेसच्या दिशा चनकापुरे व कोराडी पंचायत समितीमधून कॉंग्रेसच्या अर्चना सुरेश बोंडे विजयी
- येनवा : समीर उमप (शेकाप) विजयी
- कॉंग्रेसचे योगेश देशमुख अरोली-कोदामेंडीमधून विजयी
- गोधनी सर्कलमध्ये कॉंग्रेसच्या जोती राऊत विजयी, पंचायत समिती मध्येही कॉंग्रेस विजयी
- बेलोना मधून राष्ट्रवादी चे तीनही उमेदवार समोर
- येनवा येथून अनुराधा खराडे विजयी
- बडेगाव जि.प.गट व पंचायत समिती गणात कॉंग्रेस विजयी
- धापेवाडा येथून महेंद्र डोंगरे विजयी
- पारडसिंगा जिल्हा परिषद सर्कलमधून राष्ट्रवादी चंद्रशेखर कोल्हे विजयी
- लाडगावमधून राष्ट्रवादीच्या निलिमा ठाकरे विजयी
- रायपूर जिल्हा परिषद सर्कलमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिनेश बंग विजयी
- माहुलीमधून राजू कुसुबे विजयी, तर कॉंग्रेसचे चेतन देशमुख माहुली पं. स. मधून व चारगाव पं. स.मधून शिवसेनेचे धंगारे विजयी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress ncp lead in nagpur z p elections