प्रसुतीदरम्यान बेशुद्ध झाली महिला... मग डॉक्टरने केले असे काही

woman slaped
woman slaped

नागपूर : बाह्यरुग्ण विभागाची वेळ संपून गेल्यानंतर मेडिकलमधील एका डॉक्‍टरने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका लिपीकाला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असताना मेडिकलच्या प्रसूती वॉर्डात प्रसूतीदरम्यान एका रुग्ण महिलेच्या गालावर हाताचे ठसे उमटेपर्यंत मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. या महिलेच्या गालावर दिसत असलेले हाताचे ठसे बघून नातेवाईक संतप्त झाले. मात्र प्रसूती दरम्यान महिला वारंवार बेशुद्ध होत असल्याने तिला जागवण्याचा प्रयत्न सुरू होता असे या वॉर्डातील डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. यानंतर मात्र नातेवाईक शांत झाले.

सुरक्षित प्रसूतीसाठीची गरजेचे
मेडिकलच्या प्रसूती वॉर्ड क्रमांक 30 मधील घटना आहे. प्रसूत महिलेचे नाव शिला अमित साकतेल असे आहे. ही महिला प्रसूतीसाठी मेडिकलमध्ये आली. ती लेबर पेनमध्ये होती. मात्र सामान्य प्रसूती होत नव्हती. तर ती महिला वारंवार बेशुद्ध पडत होती. यामुळे तिच्या गालावर मारण्यात येत होते. हे दृश्‍य बघून अनेकांचे मन हेलावले. या प्रसूत महिलेचा काय गुन्हा आहे, अशी हळहळ व्यक्त होत होती. एखाद्या डॉक्‍टरने या महिलेच्या गालावर पाच बोटांचे ठसे उमटेपर्यंत मारहाण करावी का असाही सवाल विचारला जाऊ लागला. 

विशेष असे की, ही महिला मेडिकलमध्ये कार्यरत असलेल्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याची नातेवाईक आहे. एकिकडे कोरोना वॉर्डात डॉक्‍टरांकडून सेवाधर्म निभावला जात असताना दुसरीकडे प्रसूती शास्त्र विभागातील डॉक्‍टरांकडून गर्भवती महिलांना अशी मारहाण झाल्याची चर्चा होती. 

"शेण खाल्याने कोरोना होत नाही..!', काय आहे या व्हायरल मेसेजमागील तत्थ्य?
यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, प्रसूती दरम्यान महिलेस मारहाण होत असताना नातेवाईकांनी आक्षेप घेतला. गालावर मारण्यात आले. यानंतर मात्र तिची प्रसूती झाली. बराच वेळ बाळ बाहेर येत नव्हते, त्यात महिला बेशुद्ध होत होती, यामुळेच मारण्यात आल्याचे सांगण्यात आले. महिला प्रसूतीदरम्यान थकली होती, मात्र प्रसूतीदरम्यान महिलेस शुद्धीत ठेवून प्रसूती करावी लागते. यामुळे नातेवाईकांमध्ये अनेक गैरसमज पसरतात. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्याशी संपर्क साधला, परंतु मारहाणीच्या प्रकरणाची तक्रार आली नसल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com