आपले व कुटुंबीयांसोबत इतरांचे प्राण वाचवायचे तर हे करा; काय सल्ला दिला जिल्हाधिकाऱ्यांनी, वाचा

नीलेश डोये
Friday, 14 August 2020

ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याबाबतचा चुकीचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्या अफवांवर विश्वास ठेवता कामा नये , असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  खासगी डॉक्टरांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. परंतु त्या डॉक्टरांमध्ये जे काही संभ्रम आहेत, ते दूर करण्यासाठी जिल्हा टास्कफोर्सच्यासोबत त्यांची चर्चा घडवून आणल्याचे  त्यांनी सांगितले. 

नागपूर :  नागरिकांनी कोरोना या संसर्गजन्य आजाराची दहशत न बाळगता तपासणीसाठी पुढे यावे. वेळीच उपचार झाल्यास  यावर मात करता येते. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवाडी फारच बोलकी असून, खबरदारी घेण्यासोबतच तपासणीसाठी पुढे येऊन आपले व आपल्या कुटुंबियांसोबत इतरांचे प्राण वाचवा, असे भावनिक आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

 जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आजवर ४४ हजारावर कोरोनाच्या तपासण्यात करण्यात आल्या असून, यापैकी ३३७५ वर बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी आजवर जवळपास ७२ वर मृत्यू झाले आहेत.  या मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे वेळीच निदान न होणे, उशिरा तपासणी करणे आदी कारणांमुळे झाले. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीस कोरोनाचे लक्षणे दिसून येत असल्यास त्यांनी दहशत न बाळगता तपासणीसाठी पुढे आले पाहिजे. यामुळे त्या व्यक्तीसोबतच त्याचे कुटुंब, मित्र, कामाच्या ठिकाणच्या इतर सहकाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही.

जाणून घ्या - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले हे विधान...

ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याबाबतचा चुकीचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्या अफवांवर विश्वास ठेवता कामा नये , असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  खासगी डॉक्टरांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. परंतु त्या डॉक्टरांमध्ये जे काही संभ्रम आहेत, ते दूर करण्यासाठी जिल्हा टास्कफोर्सच्यासोबत त्यांची चर्चा घडवून आणल्याचे  त्यांनी सांगितले. 

माहिती नाही तर उपचार नाही
 बहुतांश नागरिक कोरोनापेक्षा त्याच्या दहशतीमुळे जास्त घाबरत आहेत.  घाबरण्याचे काहीही कारण नाही.  लोक शासकीय रुग्णालयामध्ये जाण्याऐवजी खासगी रुग्णालयांमध्ये जाण्याला प्राधान्य देत आहे. म्हणूनच आता जिल्ह्यातील प्रत्येक खासगी डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना तपासणीसाठी येणाऱ्यांची संपूर्ण माहिती (डिटेल्स) घ्या. त्याची माहिती प्रशासनाला  देण्याचे आवाहन करण्यात आले. माहिती देण्यास नकार दिल्यास अशा व्यक्तीची तपासणीच न नका करण्याचे आवाहनही करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे  यांनी सांगितले.

ठळक बातमी - बापाची मुलीला आर्त विनवणी, 'बेटा मला येथून काढ, नाही तर मी मरून जाईन, मला जगायचे आहे तुमच्यासाठी'

ग्रामीण भागातीलच डॉक्टर्स,नर्सला प्राधान्य : कुंभेजकर
आरो ग्य विभागाकडे असलेल्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता शासनानेही सीसीसीसाठी आवश्यक डॉक्टर, नर्स आदी स्टाफ भरण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्यातील स्थानिक डॉक्टर, नर्स आदींना तात्पुरत्या स्वरुपात तीन महिन्यांकरिता अपॉयमेंट दिल्या जात आहे.  जिल्ह्यात निरंतर सर्व्हेही सुरू आहे. या माध्यमातूनही लक्षणे असलेल्या व्यक्तींची रॅपिड अ‍ॅन्टिजेन  तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे असल्यास वेळीच तपासणी करून घ्यावी,  यामुळे आळा घालण्यास मदत होणार असल्याचे सीईओ योगेश कुंभजकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cooperate with the investigation, overcome the corona