विद्यापीठाच्या निर्विघ्न परीक्षेसाठी समन्वय समिती स्थापन

मंगेश गोमासे
Sunday, 4 October 2020

आता परीक्षेदरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून संपूर्ण काळजी घेण्यात येत आहे. यातूनच विद्यापीठाद्वारे कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी, शिक्षण- शारीरिक शिक्षण आणि फार्मसी शाखेच्या पेपरसाठी जिल्हास्तरावर शाखानिहाय समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. यातील प्रत्येक समितीमध्ये विविध महाविद्यालयांच्या चार प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये समन्वय साधल्या जाणार आहे.

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यपीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा घोषित झाल्यावर आता त्या परीक्षा निर्विघ्न पार पाडण्यासाठी विद्यापीठाद्वारे जिल्हास्तरावर शाखानिहाय समिती तयार केली आहे. या समितीमार्फत महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये समन्वय साधल्या जाणार आहे.

विद्यापीठाद्वारे अंतिम सत्राची परीक्षा ऑनलाइन घेण्याचे ठरले. यासाठी विद्यापीठाने ॲप तयार करीत, त्या माध्यमातून परीक्षा घेण्याचे ठरविले. मात्र, ॲप डाॉउनलोड करणे आणि प्ले स्टोअरवर न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यातच विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारल्यावर ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. आता परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

विद्यापीठाच्या पुढे ढकललेल्या परीक्षा पुढील आठवड्यापासून, नवे वेळापत्रक जाहीर

आता परीक्षेदरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून संपूर्ण काळजी घेण्यात येत आहे. यातूनच विद्यापीठाद्वारे कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी, शिक्षण- शारीरिक शिक्षण आणि फार्मसी शाखेच्या पेपरसाठी जिल्हास्तरावर शाखानिहाय समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. यातील प्रत्येक समितीमध्ये विविध महाविद्यालयांच्या चार प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये समन्वय साधल्या जाणार आहे.

याशिवाय महाविद्यालयांना येणाऱ्या विविध अडचणीबाबत विद्यापीठाला माहिती देणार आहेत. दरम्यान यामुळे विद्यापीठाला नेमके काय साध्य होणार आहे हे कळायला मार्ग नाही. परीक्षा ऑनलाइन असून केवळ प्रवेशपत्रासाठीच विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा संबंध येणार आहे.

आता विद्यापीठाने संकेतस्थळावर करेक्टेड प्रवेशपत्र टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या समितीमार्फत नेमका कुठला समन्वय ठेवण्यात येणार आहे हे कळत नाही. याबाबत परीक्षा आणि मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coordinating committee for smooth examination