फक्त कोरोनाचेच रुग्ण वाचले पाहिजे का, इतर आजारांच्या रुग्णांचे काय, नातेवाईकांचा संताप

Corona causes neglect patients of other deasies less bed in medical, meyo
Corona causes neglect patients of other deasies less bed in medical, meyo

नागपूर ः आठ महिन्यांपूर्वी कोरोनाचे संकट नागपूर जिल्ह्यावर कोसळले. त्या दिवसांपासून मेडिकल असो की, मेयो येथे कोरोना वगळता इतर आजारांच्या रुग्णांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दृश्य आहे. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतात. नुकतेच उपचाराच्या आशेने विदर्भासह इतर राज्यातून कोरोनाच्या संकट काळातही रुग्णांचे लोंढे येण्याचे थांबलेले नाहीत. मात्र येथे आल्यानंतर लगेच आल्यापावली रुग्णांना उपचाराशिवाय परत जावे लागते. नुकतेच एका रुग्णाच्या नातेवाकाने केलेल्या तक्रारीतून हे वास्तव पुढे आले. फक्त कोरोनाचेच रुग्ण वाचले पाहिजे का, इतर आजारांच्या रुग्णांचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ह्रदयावरील उपचारासाठी मेडिकलमध्ये आल्यानंतर सायंकाळी चार वाजता त्याला मेडिकलमधील डॉक्टरांनी सुपरमध्ये रेफर केले. सुपरमध्ये दुपारी रुग्ण तपासले जात नसल्याने रात्रभर बिचारा रुग्ण आणि नातेवाईकांना उघड्यावर रात्र काढली. दुसऱ्या दिवशी ह्दय विभागात पोहचले. परंतु ह्रदय विभागाचा ओपीडीचा दिवस नसल्याने कोण्याही डॉक्टरने त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही, अखेर तो रुग्ण ‘ह्दयविकार’ घेऊनच आल्या पावली परत गेला.

तेलंगणा राज्यातील अदिलाबाद येथील हा रुग्ण आहे. चाळीशीतील तरुणाला मेडिकलमध्ये उपेक्षेची वागणूक मिळाल्याने तो आल्या पावली परत गेला. हीच परिस्थिती मेयोची आहे. मेयो रुणालयातून थेट रुग्णांना मेडिकलमध्ये रेफर करण्यात येत असल्यामुळे काही प्रमाणात का होईना मेडिकलमध्ये कोविडसह इतर आजाराच्या रुग्णांचा भार वाढतो. 

त्या खाटा कमी असल्याने असे प्रकार वाढीस लागले आहेत. सध्या मेडिकलमधील ६०० खाटा कोविड हॉस्पिटलसाठी वापरण्यात येत आहेत. मेयो रुग्णालयानेही सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये ६०० खाटा कोरोना रुग्णांसाठी आरक्षित केल्या. यामुळे येथे केवळ अडीचशे खाटा इतर आजाराच्या रुग्णांसाठी शिल्लक आहेत. यामुळे इतर आजारांच्या रुग्णांना थेट मेडिकलचा रस्ता दाखवण्यात येत आहे.

कोविडसाठी नव्याने ४०० खाटा

कोरोना कमी होत आहे, मात्र दुसऱ्या लाटेच्या भीतीने कोरोनाच्या संकटकाळात मेडिकलमध्ये नव्याने ४०० खाटा कोविड रुग्णांसाठी आरक्षित करण्यात येत आहेत. यामुळे मेडिकलमधील इतर आजाराच्या रुग्णांसाठी असलेले वॉर्ड कमी झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका बीपीएल अर्थात दारिद्रयरेषेखालील घटकातील विविध आजारांच्या रुग्णांना बसतो. मेडिकलमधील ट्रॉमा केअर युनिटस अन्य काही वॉर्ड करोनाबाधितांसाठी राखीव करण्यात आले आहेत. करोनाबाधितांसाठी सध्या मेडिकलमध्ये ६०० खाटा सेवेत आहेत. मेडिकलमध्ये २००० खाटा आहेत. यापैकी ६०० खाटा कोविडच्या कमी केल्यानंतर १२०० खाटा शिल्लक आहेत. आता नव्याने ४०० खाटा कोरोनारुग्णांसाठी आरक्षित करण्यात येत आहेत. यामुळे आता कोरोना वगळता अन्य आजारग्रस्तांसाठी १००० खाटा शिल्लक राहणार आहेत. 
 

मेडिकलमध्ये ५० व्हेंटिलेट होणार उपलब्ध 

सध्याच्या स्थितीत कोरोनाबाधितांच्या ६०० खाटांमध्ये ४०० खाटांची भर पडणार आहे. विद्यमान स्थितीत मेडिकलच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये ३१० खाटा हाय डिपेन्डन्सी युनिट (एचडीयू) आणि २०० खाटा कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीने सज्ज आहेत. नव्याने वाढणाऱ्या ४०० खाटांपैकी ३५० खाटा एचडीयूसाठी आरक्षित असतील. त्यामुळे मेडिकलमधील कोव्हिड केअर सेंटरमधील एचडीयू विभाग ६६० खाटांचा होईल. यात आयसीयूमध्ये ५० खाटांची भर पडून २५० खाटा व्हेंटिलेटर्ससाठी राखीव असणार आहेत. 

संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com