कोरोनामुळे अन्य आजार झाले छूमंतर! ही आहेत कारणे... 

diseases to disappear
diseases to disappear

नागपूर : शहरातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात खासगी रुग्णालयांत दिसणारी रुग्णांची गर्दी कोरोनाच्या विषाणूमुळे कुठे गायब झाली, हे कळायला मार्ग नाही. दर दिवसाला बालरोगतज्ज्ञांच्या क्‍लिनिकसह हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागातील गर्दी हरवली आहे. कोरोना विषाणूने या सर्वांना "ब्रेक' लागला आहे. क्‍लिनिकपासून तर मोठी रुग्णालये ओस पडून आहेत. लॉकडाउनमुळे प्रत्येक नागरिक घरीच आरोग्यदायी जीवन जगू लागल्याचे वैद्यक तज्ज्ञांशी संवाद साधलेल्या संवादातून पुढे आले. लसीकरण मात्र सातत्याने सुरू आहे. 

कोरोनाच्या निमित्ताने आपण हात वारंवार धुऊ लागलो. सॅनिटायझर वापरायला सुरवात केली. मास्क वापरायला लागलो आहोत. याशिवाय व्यक्ती-व्यक्तींमधील अंतर पाळत आहोत. तसेच आपण घरी पुरेशी विश्रांती घेत आहोत. पुरेशी झोप घेत आहोत. प्रत्येकाने किमान 7 तास झोप घेणे आवश्‍यक असते. लॉकडाउनमुळे विश्रांतीची झोपेची गरज पूर्ण होत आहे. यामुळे तणाव कमी झालेला दिसतो. बहुतेक आजार हे मानसिक ताणाशी संबंधित असतात. लॉकडाउनच्या काळात आपल्याला कुटुंबाला वेळ देत आहोत. मित्र, नातेवाइकांशी आपण फोनवर संवाद साधत आहोत. या संवादामुळे तणावाची पातळी आपोआप कमी झाली आहे. यामुळे मानवी आरोग्याचा दर्जा सुधारत आहे. तसेच मनात केवळ कोरोनाचे भय आहे, इतर आजारांबाबत आपण कोणताही विचार करीत नाही.

लॉकडाउनमुळे रस्त्यावरचे चमचमीत मसालेदार पदार्थ आपले पोट बिघडवत नाही. हॉटेलमधील जेवणावर पार बंदी आली. घरी बनलेला आरोग्यदायी आहार घेत आहोत. यामुळे आजारांपासून आपण दूर आहोत. याशिवाय लॉकडाउनमुळे कार्यालये बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहने नाहीत. कारखाने बंद आहेत त्यामुळे हवा, पाणी आणि आवाजाच्या प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनावर होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रदूषणापासून होणारे आजार थांबले आहेत. 
कोरोना मुळे सर्व प्रकारच्या व्यसनांवर मर्यादा आली आहे. कोरोनाचा धोका कमी झाल्यावरही आपण या गोष्टींमध्ये सातत्य पाळले तर आपण आरोग्यदायी जगू शकतो. 

कोरोनामुळे आपण सर्व घरी आहोत. लहान मुलांच्या जंक फूडवर पडणाऱ्या उड्या बंद झाल्या. स्वच्छ वातावरणात घरीच राहातत. घरचा आहार सुरू आहे. पाणीपुरीसारखे रस्त्यावरचे पदार्थ लहान मुलांपासून दूर झाले. दूषित पाण्यापासून होणारे आजार दूर झाले. स्वच्छतेमुळे तसेही सत्तर टक्के आजारांवर मात करता येते. कोरोनामुळे मेंदूचे एकाच दिशेने विचारचक्र सुरू आहे. यामुळे आपण तणावमुक्त झालो. कोणत्याही प्रदूषणाला बळी पडत नाही. यामुळे इतर आजार डोके वर काढत नाही. 

-डॉ. उदय बोधनकर, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ, नागपूर. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com