दहावा महिना ठरतोय लकी, कोरोनामुक्तीचा आलेख वाढतोय, बाधित होताहेत कमी 

Corona control in October in Nagpur district as compared to September
Corona control in October in Nagpur district as compared to September

नागपूर : जिल्ह्याभोवती कोरोना विषाणूचा विळखा कायम असला तरी सुदैवाने आठवडा सुरू झाल्यापासून विषाणू बाधितांची संख्या कमालीची कमी झाली आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून समाधानाची बाब अशी की, मृत्यूचा टक्का कमी झाला आहे. बुधवारी (ता.७) ९७६ नव्या बाधितांची भर पडली. यामुळे आठव्या महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा ८४ हजार ८१ वर पोहचला. तर २४ तासांमध्ये २२ जण दगावल्याने मृत्यूचा आकडा २७०४ वर गेला.  तर ८३५ जणांनी कोरोनावर मात केली असल्याने कोरोनामुक्तांचा आकडा ७१ हजार ६०२ झाला आहे.

नागपूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. १ ते ७ सप्टेंबरदरम्यान नागपुरात ११ हजार ४७७ कोरोनाबाधित आढळले होते. त्या तुलनेत १ ते ७ ऑक्टोंबर या कालावधीत ६ हजार ६९ जणांना लागण झाली. बाधितांच्या संख्येत ४९ टक्क्यांनी घट झाली आहे. तर मृत्युवरही नियंत्रण आले असे म्हणता येईल. 

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ३० जण दगावले होते. तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात १९४ जणांचा मृत्यू झाला. ४० टक्के मृत्यू कमी झाले आहेत. या घडामोडीत बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील २२ जणांचा मृत्यू झाला असून यातील १४ जण नागपूर शहरातील आहेत. तर ४ ग्रामीण भागातील आहेत. तर ४ जण जिल्हाबाहेरील असल्याची नोंद करण्यात आली. मेयो मेडिकलमध्ये मृत्यूची १२ जण दगावले आहेत, तर उर्वरित मृत्यू खासगी रुग्णालयातील आहेत.

दर दिवसाला होणाऱ्या चाचण्यांची संख्या बऱ्यापैकी होत आहे. ५ हजार ९१८ चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ९७६ जण बाधित आढळले. यातील शहरातील ७६३ तर २०९ ग्रामीण भागातील आहेत. नेहमीप्रमाणे खासगी प्रयोगशाळेत १७४५ जणांच्या चाचण्या झाल्या असून यापैकी ४३९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. 

एम्समध्ये झालेल्या ३१९ चाचण्यांपैकी ३९, तर मेडिकलमध्ये ५३५ चाचण्या झाल्या असून यातील २५ जण कोरोनाबाधित आढळले. मेयो रुग्णालयात ७०७ चाचण्यापैकी ६७ जण बाधित आढळले. माफसू प्रयोगशाळेत ७५ चाचण्यांपैकी १९ जणांना कोरोना जडल्याचे निदान झाले. निरी प्रयोगशाळेत १९६ नमूने तपासण्यात आले असून यातील ३५ जण बाधित आढळले. अँटिजन चाचणीतून ३५२ जणांना बाधा झाल्याचे तपासणीतून पुढे आले. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील मेयो, मेडिकल, एम्सरह विविध कोविड रुग्णालयात ९७७५ सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सूरू आहेत.

असे आहेत मृत्यू

  • मेडिकल -११५०
  • मेयो -१०६१
  • एम्स - १५
  • खासगी रुग्णालये-४७९

दृष्टिक्षेपात कोरोना

  • दैनिक संशयित-५९१८
  • आजचे कोरोना पॉझिटिव्ह- ९७६
  • आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह- ८४०८१
  • दैनिक कोरोनामुक्त- ८३५
  • आतापर्यंत कोरोनामुक्त- ७१६०२
  • कोरोना एक्टिव्ह रुग्ण- ९७७५
  • दैनिक तपासणी नमुने- ५९१८
  • आतापर्यंत तपासलेले नमुने-४९२९६७ 

संपादन  : अतुल मांगे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com