मुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर! विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु 

20 trains are starting from 20 october in maharashtra
20 trains are starting from 20 october in maharashtra

अमरावती : कोरोना आणि लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वेसेवा थोड्याफार प्रमाणात रुळावर येत आहे. अनलॉक पाचमध्ये राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार रेल्वेखात्याने दसरा-दिवाळी सणासाठी येत्या 20 ऑक्‍टोबरपासून रेल्वे सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे. 15 ऑक्‍टोबरपासून आरक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे.

अमरावतीकरांसाठी जिव्हाळ्याची अमरावती- सीएसटी ( अंबा एक्‍स्प्रेस), गोंदिया- मुंबई (सीएसटी) विदर्भ व गोंदिया -कोल्हापूर महाराष्ट्र एक्‍स्प्रेस यासह मुंबई-जालना जनशताब्दी एक्‍स्प्रेस, मुंबई-नांदेड तपोवन एक्‍स्प्रेस, पुणे-नांदेड सुपरफास्ट एक्‍स्प्रेस या मराठवाड्यातील प्रवाशांसाठी उपयोगी ठरणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांसाठी 15 ऑक्‍टोबरपासून आरक्षण करता येणार आहे.

मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या राज्यात अधिक आहे. मार्च महिन्यापासून या गाड्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर बंद झाल्याने अडचण निर्माण झाली होती. ती तब्बल सहा महिन्यानंतर पाचव्या अनलॉकमध्ये सुटली आहे. दसरा व दिवाळी या सणांच्या तोंडावर गाड्या सुरू होणार असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.

या गाड्या सुरू होणार

मुंबई-अमरावती एक्‍स्प्रेस, मुंबई-नागपूर (सेवाग्राम एक्‍स्प्रेस), 
मुंबई-गोंदिया (विदर्भ एक्‍स्प्रेस), 
पुणे-नागपूर सुपर फास्ट, 
पुणे-नागपूर (गरीबरथ एक्‍स्प्रेस), 
पुणे-भुसावळ, कोल्हापूर-गोंदिया (महाराष्ट्र एक्‍स्प्रेस), 
मुंबई-पुणे (डेक्कन एक्‍स्प्रेस), 
मुंबई-पुणे (इंटर सिटी), 
मुंबई-पुणे (सिंहगड), 
मुंबई-पुणे (प्रगती एक्‍स्प्रेस), 
मुंबई-लातूर, मुंबई-सोलापूर (सिद्धेश्वर एक्‍स्प्रेस), 
मुंबई-कोल्हापूर (महालक्ष्मी एक्‍स्प्रेस), 
पुणे-सोलापूर (हुतात्मा एक्‍स्प्रेस) 
आदी गाड्या 20 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com