बाधितांसह कोरोनाचे मृत्यू वाढले; २४ तासांत १५ जणांचा मृत्यू 

corona deaths increased in Nagpur district
corona deaths increased in Nagpur district

नागपूर  ः सुमारे ४० दिवसांनंतर गुरुवारी कोरोनाबाधितांचा उच्चांकी आकडा पुढे आला. गुरुवारी ५३६ कोरोनाबाधित आढळून आले. तर २४ तासांमध्ये १५ जण दगावले आहेत.

दिवसेंदिवस नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती दूर होत आहे. तरी हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागपूर जिल्ह्यात २२ ऑक्टोबर २०२० रोजी ६०२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले होते. यानंतर कोरोनाचा आलेख खाली आला. मात्र, पुन्हा चाळीस बेचाळीस दिवसांनंतर कोरोनाचे ५३६ रुग्ण आढळले. यात शहरातील ४४१, ग्रामीण ९२, जिल्हाबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. तर २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ८ मृत्यू झाले. 

शहरात ५, ग्रामीणमध्ये ३ जिल्ह्यात धरून एकूण १५ मृत्यू झाले. आजपर्यंत शहरातील दगावणाऱ्यांची संख्या २ हजार ५५०, ग्रामीण भागात ६४०, तर जिल्हाबाहेरील ५१७ रुग्ण दगावले. असे एकूण ३ हजार ७०७ वर पोहचली आहे. नागपुरातील १३ तालुक्यांमध्ये गुरूवारी ९२ जणांना बाधा झाल्याचे पुढे आले. यामुळे आतापर्यंत २३ हजार ७ वर बाधितांचा आकडा पोहचला आहे. तर यातील २१ हजार ७४९ जणांनी कोरोनावर मात केली. 

सध्या ५८० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी ६ हजार ६११ चाचण्या झाल्या आहेत. बाधित आणि मृत्यूंमध्ये आज वाढ झाली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या एक लाख १३ हजार २६९ झाली आहे. तर मृत्यूंची संख्या ३ हजार ७०७ वर पोहचली आहे.

गृहविलगीकरणात ३ हजार ८५७

पंधरा दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यात गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या २ हजार ८०० वर आली होती. मात्र अलीकडे हळूहळू कोरोना रुग्णांचा आलेख चढत आहे. आज गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ८५७ वर पोहोचली. शहरी भागात गुरुवारी ४ हजार ६२५, ग्रामीणला ८०० असे एकूण ५ हजार ४२५ सक्रिय उपचाराधीन कोरोना बाधित रुग्ण होते. त्यातील १ हजार ३३ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात ३०७ कोरोनामुक्त

शहरात गेल्या काही दिवसांपासून रोज कोरोनामुक्तांहून नवीन कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. तर गुरुवारी शहरात २७०, ग्रामीणला ३७ असे एकूण ३०७ कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या ८२ हजार ३८८, ग्रामीण २१ हजार ७४९ अशी एकूण १ लाख ४ हजार १३७ वर पोहचली आहे.

संपादित : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com