esakal | अरे बापरे! करोना झालेल्या व्यक्तीच्या बाजूला बसून केला दुबई ते बंगळुरू प्रवास...मग
sakal

बोलून बातमी शोधा

corona Doubt patient admit in medical

अरे बापरे! करोना झालेल्या व्यक्तीच्या बाजूला बसून केला दुबई ते बंगळुरू प्रवास...मग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भारतातून 31 लोकांचा समूह दुबईत फिरायला गेला होता. काही व्यक्ती 20 तारखेला परत आले तर काही 26 तारखेला आले. उशिरा येणाऱ्या व्यक्तींमध्ये दुबई-नागपूर प्रवासादरम्यान येणारा एक व्यक्ती "कोरोनाग्रस्त' व्यक्तीच्या संपर्कात आला. कोरोनाग्रस्त व्यक्ती दुबई-बंगळुरू, नागपूर विमानात सीट क्रमांक 25 वर बसला होता. त्याच्या बाजूला नागपूरचा व्यक्ती होता. मात्र, नागपुरातील त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नाही. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून त्या व्यक्तीची शोधाशोध सुरू झाली. गुरुवारी (ता. 5) सायंकाळी आरोग्य विभागाच्या पथकाने त्या व्यक्तीला शोधून आणले. सध्या मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये विशेष कक्षात ठेवण्यात आले. त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेत आले. मेयोत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. 

मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागपुरातील व्यक्तीचा शोध घेण्यात येत होता. परंतु, कुठे राहतात? हे कळत नव्हते. अखेर आरोग्य विभागाच्या पथकाने पुरेपूर माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेतला आणि मेडिकलमध्ये दाखल केले. शुक्रवारपासून विदेशवारीवरून परत आलेल्या प्रवाशांची थर्मल चाचणी होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

हेही वाचा - हिंगणघाटच्या आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पेशी; काय झाला निर्णय?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य शासनाला दुबई-बंगळुरू विमान प्रवासादरम्यान कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णाच्या शेजारच्या सीटवर एक नागपूरची व्यक्ती प्रवास करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. ही माहिती नागपूरच्या आरोग्य विभागाकडे येताच नागपूर महापालिकेसह सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. सुरक्षिततेचा उपाय म्हणून गुरुवारी मेडिकलमध्ये तयार सात खाटांच्या विशेष कक्षात ठेवण्यात आले. विविध वैद्यकीय तपासणी होत असून, सध्या या व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण नसल्याचे डॉक्‍टरांकडून कळविण्यात आले.

31 लोकांचा समूह 15 ते 30 फेब्रुवारीपर्यंत दुबईला फिरायला गेला होता. यापैकी 27 जण 21 फेब्रुवारीला भारतात परतले. उर्वरित 4 जण 26 फेब्रुवारीला नागपुरात आले. या चौघांनी दुबई ते बंगळुरू असा एकत्र विमान प्रवास केला. याप्रसंगी विमानातील सीट क्रमांक 25 वर कोरोनाग्रस्त व्यक्ती मेडिकलमध्ये भरती करण्यात आलेल्या रुग्णाच्या शेजारी बसला होता. 

कोरोनाग्रस्त व्यक्ती तेलंगणाचा असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आलेला व्यक्ती नागपुरातील अंबाझरी परिसरातील आयटी पार्क परिसरातील आहे. नागपूरचा व्यक्ती बंगळुरूवरून नागपूरला विमानाने परत आला. सधया नागपुरातील मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. 

विमानतळावर थर्मल चाचणी सुरू

नागपूरमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंतराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवार पहाटेपासून स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. येथे थर्मल चाचणी करण्यात येणार आहे. आंतराष्ट्रीय विमान येणाऱ्या वेळात आरोग्य विभागाचे वैद्यकीय पथक संशयित रुग्णांची तपासणी करतील. येथे थर्मल स्कॅनर लावण्यात आल्याची माहिती आहे.

क्लिक करा -  मुंढे साहेब, हे अतिक्रमण काढण्याची हिंमत दाखवाच...

संशयित रुग्ण मेडिकलमध्ये येऊन परत गेला

कोरोनाची लागण असलेल्या इराणमधून काही दिवसांपूर्वी आलेला एक व्यक्ती आरोग्य विभागाच्या हाती अद्याप आला नाही. दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी मेडिकलमध्ये कोरोनाग्रस्त देशातून आलेला एक रुग्ण उपचार न घेताच परत गेल्याची माहिती पुढे आली आहे. आरोग्य विभागाकडे या रुग्णाची माहिती नसल्याचे उघड झाले. भारतात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून प्रचंड काळजी घेतली जात असताना कोरोनाग्रस्त देशातून प्रवासाची पार्श्‍वभूमी असलेला व्यक्ती नागपुरात येतो, मेडिकलमध्ये उपचारासाठी जातो. यानंतर उपचार न घेताच परत जातो, याची माहिती आरोग्य विभागाला मिळत नाही, ही शोकांतिका आहे.