बात नैनो की, कधी पेरता येणार त्यांच्या डोळ्यात उजेड?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

यावर्षी 2018-19 मध्ये नागपूर जिल्ह्यात यावर्षी 496 व्यक्तिंचे नेत्रदान झाले. यापैकी 144 दृष्टीहिन बांधवांच्या डोळ्यांत उजेड पेरण्यात आला. यातील मेडिकलच्या नेत्ररोग विभागात 81नेत्रगोल मिळाले. त्यात 65 व्यक्तींच्या काळोख दाटलेल्या डोळ्यांना नजर आली आहे.

नागपूर : रब कि नेमत है तेरी निगाहे
जिसमे बसती है उसकी दुआएँ
ऐसे नैनो की बातो मे कोई क्‍यो ना आए
डोळ्यांविषयी असे खूप काही कवींनी लिहून ठेवले आहे. मात्र हे नेत्रसुख सगळ्यांनाच लाभते असे नाही. दुर्दैवाने अनेक व्यक्‍ती नेत्रहिन असतात. जीवित व्यक्‍तींनी नेत्रदानाचा संकल्प केल्यास नेत्रहिनांची दृष्टी परत येऊ शकते. तसा प्रयत्न शासन आणि अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केला जातो. सुदैवाने त्या प्रयत्नांना यशही येते आहे. मात्र लॉकडाऊनने सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत. नेत्रदान आणि नेत्रप्रत्यारोपणालाही त्याचा फटका बसला आहे.
मागील तीन महिन्यात शहरात एकही "बुब्बुळ प्रत्यारोपण' करता आले नाही. आणि या काळात नेत्रदानही झाले नसल्याची माहिती पुढे आली आहे. जगातील प्रत्येक पाच अंधांपैकी एक अंध भारतात आहे. जगात एकूण साडेचार कोटींपैकी भारतात सुमारे एक कोटी सत्तर लाख दृष्टीहिन आहेत. त्यापैकी 55 टक्के अंधत्व केवळ मोतिबिंदूमुळे आलेले असते. नेत्ररोपण शस्त्रक्रियेद्वारे यांना पुन्हा दृष्टी प्राप्त होऊ शकते.
देशात गतवर्षी केवळ 52 हजार नेत्रगोल दानातून जमा झाले. 28 हजार व्यक्तिंमधील अंधत्व दूर करण्यात यश आले. दरवर्षी देशात एका वर्षात 2 लाख नेत्रगोलांची गरज आहे, मात्र अवघ्या 52 हजार नेत्रगोल दानावर समाधान मानावे लागले. कोरोना लॉकडाउनमुळे मार्च ते जून या तीन महिन्यात एकही बुब्बुळ नेत्रदानातून मिळाले नाही. यामुळे शहरातील नेत्रदानाला लॉकडाउनचा फटका चांगलाच बसला. दरवर्षी 35 ते 40 हजार नवीन अंधांची भर पडते. एका व्यक्तीच्या दोन डोळ्यांचा लाभ दोन अंधांना होतो. शस्त्रक्रिया म्हणजे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम हा विचार न करता बुब्बुळरोपण, तिरळेपणा, काचबिंदू या अंधत्वाच्या कारणांवरही मेडिकलच्या नेत्र विभागातून काम होते. यावर्षी 2018-19 मध्ये नागपूर जिल्ह्यात यावर्षी 496 व्यक्तिंचे नेत्रदान झाले. यापैकी 144 दृष्टीहिन बांधवांच्या डोळ्यांत उजेड पेरण्यात आला. यातील मेडिकलच्या नेत्ररोग विभागात 81 नेत्रगोल मिळाले. त्यात 65 व्यक्तींच्या काळोख दाटलेल्या डोळ्यांना नजर आली आहे. 2019 ते फेब्रुवारी 2020 या काळात केवळ 80 व्यक्‍तींच्या डोळ्यात उजेड पेरता आला.

वाचा- "त्यांच्या' बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...

मृत्यू अर्जावर असावा नेत्रदानाचा संदेश
राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णाचा "डेथ' फार्म भरावा लागतो. त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास ज्या डॉक्‍टरकडून हा फार्म भरला जातो, त्यांनी रुग्णाचे समुपदेशन केल्यास नेत्रदानाचा टक्का वाढू शकतो. यामुळे शेकडो दृष्टीहिनांना दृष्टी लाभेल.  

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect: Lockdown stopped eye donation

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: