मेडिकल :  कोरोनाचे १४९ मृत्यू; इतर आजारांचे २३३

केवल जीवनतारे
Wednesday, 28 October 2020

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचा दरही खाली आला आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. मात्र कोरोनाचा मृत्यूदर कमी झाला असला तरी इतर आजारांचा मृत्यूदर वाढला आहे,

नागपूर  ः ऑॅक्टोबर महिन्यातील मृत्यूचा दर बघता कोरोनाच्या बाधेने दगावलेल्या रुग्णांपेक्षा इतर आजारांनी दगावलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. कोरोनामुळे १४९ तर इतर आजारांमुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या २३ असल्याची माहिती पुढे आली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचा दरही खाली आला आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. मात्र कोरोनाचा मृत्यूदर कमी झाला असला तरी इतर आजारांचा मृत्यूदर वाढला आहे, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

महत्त्वाची बातमी - तुम्हालाही जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे? मग जरा थांबा आधी हे वाचा
 

१ ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत मेडिकलमध्ये दगावलेल्या ३८२ मृत्यूंपैकी ३९ टक्के अर्थात १४९ रुग्ण कोरोना विषाणूच्या बाधेमुळे दगावले आहेत. तर २३३ मृत्यू क्षयरोगासह कॅन्सर, डेंगीसह इतर आजारांमुळे दगावले आहेत. यावरून ६१ टक्के मृत्यू इतर आजारांमुळे झाल्याची नोंद आहे.

मेडिकलमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र मेयो, एम्स आणि इतर रुग्णालयांच्या तुलनेत मेडिकलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाच्या रुग्णांसहित इतर आजारांचे सुमारे ८०० रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी भरती आहेत. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात अतिशय नियोजनबद्ध कोरोनावर काम सुरू आहे.

कोरोनाचा मृत्यूदर खाली 
इतर आजारांच्या रुग्णांना मेडिकलमध्येच रेफर केले जात आहे. मेडिकलमधील कोरोनाचा मृत्यूदर खाली आला आहे, ही बाब दिलासा देणारी आहे. सध्या मेडिकलमध्ये ७५० रुग्ण इतर आजारांचे उपचारासाठी भरती आहेत.
-डॉ.अविनाश गावंडे, अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona mortality in medical  hospital down