esakal | नोव्हेंबर ठरतोय धोकादायक! कोरोनामुक्तांपेक्षा कोरोनाबाधित दुप्पट; ३८९ नवीन बाधितांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient high in Nagpur

जिल्ह्यात झालेल्या साडेतीन हजार मृत्यूंमध्ये शहरातील २ हजार ४८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागातील ५९९ जण दगावले आहेत. जिल्ह्याबाहेरील ४५८ जण दगावले आहेत. दरम्यान, दिवसभरात शहरातील १०२ जणांनी कोरोनावर मात केली. याशिवाय ७३ जण ग्रामीण भागातील आहेत.

नोव्हेंबर ठरतोय धोकादायक! कोरोनामुक्तांपेक्षा कोरोनाबाधित दुप्पट; ३८९ नवीन बाधितांची भर

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांपेक्षा कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू फुगत आहे. बुधवारी (ता. १८) १७५ जणांनी कोरोनावर मात केली तर ३८९ जण बाधित झाले. नोव्हेंबरमध्ये सुरुवातीचे दोन-तीन दिवस बाधितांची संख्या वाढलेली होती. मात्र, त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांहून कोरोनामुक्त अधिक आढळत होते. मात्र, दोन दिवसांपासन प्रथमच कोरोनामुक्तांहून बाधितांचा आकडा वाढलेला दिसत आहे.

बुधवारी कोरोनामुक्तांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. २४ तासांमध्ये ७ बाधितांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात मृतांची संख्या ३ हजार ५३८ झाली आहे. तर बाधितांचा आकडा १ लाख ७ हजार २१३ झाला आहे.

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू

बुधवारी नवीन कोरोना बाधितांमध्ये शहरातील ३३१ तर नागपूर ग्रामीणमधील ५४ जणांचा समावेश आहे. तर जिल्ह्याबाहेरून रेफर झालेल्या ४ बाधितांचाही यात समावेश आहे. आठ महिन्यांत शहरात कोरोनाबाधितांची संख्या ८४ हजार ५९० झाली आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णसंख्या २१ हजार ९८३ झाली. जिल्ह्याबाहेरून आतापर्यंत ६४० जणांना नागपुरात रेफर करण्यात आले.

जिल्ह्यात झालेल्या साडेतीन हजार मृत्यूंमध्ये शहरातील २ हजार ४८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागातील ५९९ जण दगावले आहेत. जिल्ह्याबाहेरील ४५८ जण दगावले आहेत. दरम्यान, दिवसभरात शहरातील १०२ जणांनी कोरोनावर मात केली. याशिवाय ७३ जण ग्रामीण भागातील आहेत.

चाचण्यांची संख्या वाढली

नागपूर जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये १८ दिवसांमध्ये बुधवारी चाचण्यांनी उच्चांक गाठला आहे. शहरात ५ हजार १७७ तर ग्रामीणमध्ये १ हजार ५०८ चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ३८९ बाधित आढळले. उद्रेकानंतर हा चाचण्यांचा उच्चांक आहे. मात्र, बाधितांची संख्या त्या तुलनेत अतिशय कमी आहे. मात्र, खबरदाचा उपाय म्हणून शासनाने आखून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जाणून घ्या - ‘पदवीधर’ची धुरा सांभाळणारे नगरसेवक अपदवीधर! ३४ पैकी फक्त सहा जण बजावू शकणार मतदानाचा हक्क

२ हजार ८२ रुग्ण गृहविलगीकरणात

नागपूर शहरी भागात बुधवारी २ हजार ७६९, ग्रामीणला ५३२ असे एकूण ३ हजार ३०१ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले. त्यातील ८३० गंभीर व जोखमेतील रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर २ हजार ८२ रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहे. तर बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंकत ३८९ रुग्णांवर उपचाराची प्रक्रिया सुरू होती.

संपादन - नीलेश डाखोरे