
प्रवीण हिरामण शिरभाते (वय 47, रा. हेमंत अपार्टमेंट, उज्वलनगर), शुभम दत्तात्रय गादेवार (वय 25, रा. उज्वलनगर), अशी मृतांची नावे आहेत. तर, पंकज शहा, केतन बानोडे दोघेही गंभीर जखमी झाले. दिवाळीच्या आदल्या रात्री चौघेही कारने जेवण करण्यासाठी भांब येथे गेले होते.
जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू
यवतमाळ : भरधाव वेगातील कार सुरक्षा कठड्यावर आदळून पलटी झाली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर, दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता.14) मध्यरात्री दीड वाजता दरम्यान आर्णी मार्गावरील तंदुर वाटीका हॉटेलजवळ घडली. दिवाळीच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रवीण हिरामण शिरभाते (वय 47, रा. हेमंत अपार्टमेंट, उज्वलनगर), शुभम दत्तात्रय गादेवार (वय 25, रा. उज्वलनगर), अशी मृतांची नावे आहेत. तर, पंकज शहा, केतन बानोडे दोघेही गंभीर जखमी झाले. दिवाळीच्या आदल्या रात्री चौघेही कारने जेवण करण्यासाठी भांब येथे गेले होते.
हेही वाचा - आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे
जेवण करून परत येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार तंदुर वाटीका हॉटेलजवळ असलेल्या सुरक्षा कठड्यावर आदळली. पुढे जाऊन कार पलटी झाली. भीषण अपघातात कारचे दरवाजे उघडल्या गेल्याने चौघेही वाहनाबाहेर फेकल्या गेले. अपघात झाल्याचा आवाज ऐकूण नागरिक हॉटेलबाहेर आले. यवतमाळ ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले.
रुग्णवाहिकेने चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आली. प्रवीण शिरभाते, शुभम गादेवार यांची तपासणी करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमींवर उपचार सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वृत्तलिहेस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता. पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
इंजिनचे झाले तुकडे
व्यावसायिक असलेले चौघेही जेवण करून यवतमाळकडे परत येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या भीषण अपघातात इंजिनचे तुकडे झाले. वेग मर्यादा दाखविणारे मिटर शंभरवर ब्लॉक झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यावरून या अपघाताची भीषणता लक्षात येते.
संपादन - अथर्व महांकाळ