बोंबला! नागरिकांनी केली पार्टी अन् ७०० लोकांना व्हावे लागले क्वारंटाईन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

लॉकडाउन चारमधील शिथिलतेमुळे नाईक तलाव परिसरातील काही उत्साही नागरिकांनी पार्टी केली. त्यानंतर 11 दिवसांत या परिसरातून 102 नागरिकांना कोरोनाचे निदान झाले. गेल्या 28 मेपासून आतापर्यंत येथील सातशे नागरिकांना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे.

नागपूर : नाईक तलाव परिसरात एका पार्टीमुळे सातशे नागरिकांना विलगीकरण केंद्रात दिवस काढावे लागत असून आज सायंकाळी कोरोनाचे निदान झालेल्या 22 जणांसह शंभरावर नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. या परिसरातील सातशे नागरिकांना आतापर्यंत विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले असून यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एका उत्साही कोरोनाबाधितामुळे संपूर्ण नाईक तलाव परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरला. 

लॉकडाउन चारमधील शिथिलतेमुळे नाईक तलाव परिसरातील काही उत्साही नागरिकांनी पार्टी केली. त्यानंतर 11 दिवसांत या परिसरातून 102 नागरिकांना कोरोनाचे निदान झाले. गेल्या 28 मेपासून आतापर्यंत येथील सातशे नागरिकांना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे. सतरंजीपुरा व मोमिनपुऱ्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने नाईक तलाव परिसरातून नागरिकांना विलगीकरणात नेण्यात आले. विशेष म्हणजे यातून 80 नागरिक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले, असे महापालिकेतील अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावर यांनी आज दुपारी "सकाळ'सोबत बोलताना सांगितले. 

नाईक तलाव परिसर नवा हॉटस्पॉट
त्यानंतर सायंकाळी नाईक तलाव परिसरातील 22 जणांना कोरोना झाल्याचा अहवाल आला. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 102 वर पोहोचली. 29 मे रोजी 19 जण कोरोनाबाधित आढळले होते. यातील 16 जण पार्टी करणाऱ्या एकाच कुटुंबातील होते, असे समजले. 5 मे रोजी 33 तर आज 22 जण कोरोनाबाधित आढळले.

नागपुरमध्ये पॉश फ्लॅटमधील सेक्‍स रॅकेटवर छापा

याशिवाय दररोज दोन ते पाच नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. लॉकडाउन शिथिलतेमुळे दुकाने उघडल्याच्या आनंदात एका नागरिकाने या परिसरात मोठी पार्टी केली. याच पार्टीतील एकजण कोरोनाबाधित असल्याचे तपासणीनंतर आढळून आले. त्यानंतर एकाच कुटुंबातील 16 जण कोरोनाबाधित आढळल्याने या परिसरात खळबळ माजली होती. त्यानंतर येथील नागरिकांना दर दोन दिवसांनी विलगीकरणासाठी नेण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive patient attended party at nagpur