कोरोनाचा धोका कायम; ग्रामीण भागात चाचण्या वाढवणार: जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे

corona testing will increased in rural area in Nagpur
corona testing will increased in rural area in Nagpur

नागपूर : गेल्या दोन-चार दिवसांपासून शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. ग्रामीणमध्ये हा प्रादुर्भाव नियंत्रणात असला, तरी काही तालुक्यात पॉझिटिव्हीटी दर वाढतच चालला आहे. ही चिंतेची बाब आहे. हा दर पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासोबतच ग्रामीण भागात प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

शहरातून ग्रामीण भागात नागरिकांची ये-जा सुरू असते. शहरी भागात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात संसर्ग पसरू नये, यासाठी तपासण्या दुप्पट करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. डिसेंबरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या २३९० होती. जानेवारीत १७९३ वर आली व फेब्रुवारीच्या ११ तारखेपर्यंत ४३७ रुग्ण बाधित आढळून आले. 

ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र आहे. काही तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हचा दर हा वाढत आहे. ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. वाढत्या संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी उपाययोजना प्रशासनाकडून सुरू झाल्यात. नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक दिशानिर्देशाचे पालन करण्यासोबत गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकांनी नियमांचे पालन न केल्यास पुन्हा दंडात्मक कारवाई सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पत्रपरिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते.

या तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ

नागपूर ग्रामीण, सावनेर, कामठी, हिंगणा तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा दर वाढत आहे. हिंगणा, कळमेश्वर, नागपूर, नरखेड, रामटेक व उमरेडमध्ये मृत्यू संख्याही जास्त आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com