नागपूर ब्रेकिंग : उपराजधानीत आणखी एक मृत्यू, संख्या 15 वर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

नागपुरात गेल्या 24 तासांत आढळलेल्या रुग्णांमध्ये गांधीबागचे (सिम्बॉयसीस विलगीकरणातील), लष्करीबाग, जाफरनगरचा, आझादनगर टेका, मुंबईहून परतलेला व मेडिकलला दाखल एका रुग्णासह अमरावती मार्गावरील चौदा मिल येथील 9 अशा 16 जणांचा समावेश आहे.

नागपूर : कोरोनाने सोमवारी उपराजधानीत आणखी एकाचा मृत्यू झाला. मृत 42 वर्षीय व्यक्‍ती हंसापुरी येथील रहिवासी आहे. या मृत्यूमुळे मृतांचा आकडा 15 वर गेला. तर सोमवारी आणखी एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाल्याने रुगणसंख्या 709 वर गेली. मेडिकलच्या ट्रॉमा केअर युनिटमधील 'सारी' आजाराच्या विभागात तीन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या अमरावती येथील 58 वर्षीय महिलेचा कोरोनाच्या बाधेने रविवारी सायंकाळी मृत्यू झाला होता.

या महिलेस 4 जून रोजी अमरावती येथून नागपुरात आणले होते. सारी आजाराचे निदान झाले. मात्र, शासनाच्या निर्देशाप्रमाणे सारी आजार असलेल्या रुग्णांची कोविड चाचणी सक्तीची असल्याने कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोनाची बाधा झाल्याचे प्रयोगशाळेतील निदानातून पुढे आले. कोविड वॉर्डात दाखल केल्यानंतर महिलेची प्रकृती गंभीर झाली. व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. मात्र काही वेळात या महिलेचा मृत्यू झाला. सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी कोरोनाच्या बाधेने नागपुरात 14 व्या मृत्यूची नोंद झाली. तर शहरात दिवसभरात आणखी 16 जणांना बाधा झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 708 वर पोहचला.

नागपूरच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

रविवारी दिवसभरात चौदा मैल येथील एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रयोगशाळेतून पुढे आले. यामुळे चौदामैल कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होऊ शकतो. यापेक्षा भयावह बाब अशी आहे की, उत्तर नागपुरातील टेका-आझादनगर आणि लष्करीबाग या दोन वस्त्यांमध्ये कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय जाफरनगरदेखील कोरोनाच्या नकाशावर आले. या दोन्ही वस्त्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले. सध्या शहरातील मेयो, मेडिकल आणि एम्समध्ये 236 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. तर 469 जणांनी कोरोनावर मात केली. शहरात 11 मार्च ते आतापर्यत 13 मृत्यू झाले. मृत्यूचा आकडा नियंत्रणात असला तरी बाधितांचा आकडा वाढत आहे. शहरातील पन्नासहून अधिक वस्त्या कोरोनाचे "हॉटस्पॉट' ठरत आहेत.

हेही वाचा : ऐन काेराेनात नागपूर मनपा-खाजगी रुग्णालयांत वादाची ठिणगी

अकोला जिल्ह्यात आजपर्यंत 794 रुग्ण आढळले. त्यापाठोपाठ नागपुरची संख्या 709 वर पोहचली. उपराजधानीत गेल्या 24 तासांत आढळलेल्या रुग्णांमध्ये गांधीबागचे (सिम्बॉयसीस विलगीकरणातील), लष्करीबाग, जाफरनगरचा, आझादनगर टेका, मुंबईहून परतलेला व मेडिकलला दाखल एका रुग्णासह अमरावती मार्गावरील चौदा मिल येथील 9 अशा 16 जणांचा समावेश आहे. मोमिनपुरा, सतरंजीपुरा, गोळीबार चौक, नाईक तलाव-बांगलादेश आणि आता चौदा मैल हॉटस्पॉट ठरण्याची शक्‍यता आहे. यापुढची वस्ती कोणती असेल हे सांगता येत नसले तरी दाट लोकवस्तीत कोरोनाचा संसर्ग गतीने वाढण्याची चर्चा आहे.

  • आतापर्यंत कोरोनाबाधितांचे मृत्यू : 15
  • आतापर्यंत कोरोनामुक्त व्यक्ती : 469

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update : 1 more died in Nagpur, total 15