रात्रशाळा अडचणीत, शिक्षक-कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ

Corona's crisis at the root of night schools!
Corona's crisis at the root of night schools!

नागपूर  : होतकरू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेल्या रात्रशाळांना आता करोनाचा फटका बसण्याची दाट शक्‍यता निर्माण झालेली आहे. जिल्हापरिषदा, नगरपालिकांमध्ये विद्यार्थी संख्या घटण्याची चिन्हे असताना, आता रात्रशाळांवरही विद्यार्थी कमी होण्याचे संकट निर्माण झाले आहे. टाळेबंदीत रोजगार गेल्याने अनेक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील काय? हा प्रश्‍न आहे. यामुळे या शाळांमधीलही शिक्षक व कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे.

राज्यात 250 रात्रशाळा असून त्यामध्ये  हजारावर शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. विभागात 14 रात्रशाळा तर एकट्या नागपुरात 12 रात्रशाळांचा समावेश आहे. त्यात अडीचशे शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून जवळपास एक हजारावर मुले शिकतात. काम करुन शिकता यावे यासाठी रात्रशाळांची सुरुवात करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागातील होतकरू तरुणांना त्याचा बराच फायदा होतो. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून करोनाचे संकट राज्यासह देशावर आहे. यामुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आलीत.

अद्याप शाळांच्या प्रवेशाची तारीख निश्‍चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्रशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही प्रवेशाबाबत संकट कायम आहे. विशेष म्हणजे टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. रात्रशाळेत प्रवेश घेणारे विद्यार्थी जवळपास परिस्थितीनुसार शिक्षण घेत असल्याने सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, तरुणांकडे नोकरीच उपलब्ध नसल्याने प्रवेश आणि शिकण्याचे पैसे आणायचे कुठून हा प्रश्‍न आहे. मात्र, याचा फटका रात्रशाळांना बसणार आहे. अनेक शाळा विद्यार्थी संख्येअभावी बंद पडणार असल्याने यामध्ये काम करणारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त होण्याची पाळी येणार आहे.


राज्यातील शाळा 250
नागपूर विभाग - 14
नागपूर - 14
शिक्षक व कर्मचारी - 1000 हजार
नागपूर 150


करोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यात अशा परिस्थितीमध्ये होतकरू मुले शिक्षणापेक्षा रोजगाराला प्राधान्य देतील. त्यामुळे रात्रशाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होणार आहे. याचा फटका शाळा व्यवस्थापनावर पडण्याची शक्‍यता आहे.

सुनील ठाणेकर, अध्यक्ष, रात्रशाळा कृती समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com