लॉकडाऊन शिथिल होताच गुन्हेगार सैराट, मॉर्निंग वॉक दरम्यान घडली ही घटना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

वृद्धा एकटी व बेसावध असल्याचे बघून पाळत ठेवून असलेल्या दुचाकीस्वाराने स्वत:च्या चेहरा पांढऱ्या रंगाच्या दुपट्ट्याने झाकला होता. त्याने वृद्धेजवळ येऊन गळ्यातील १२ ग्रॅम सोन्याची चेन, १ ग्रॅमचा पेंडाल असे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. वृद्धा दुचाकीस्वाराचा प्रतिकार सुद्धा करु शकली नाही.

अमरावती  : लॉकडाऊनमध्ये शासनाने सूट देताच, गुन्हेगार सुद्धा सैराट झाल्याचे दिसून येते. राठीनगरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या वृद्धेच्या गळ्यातील ३२ हजार ७०० रुपयांचे दागिने दुचाकीस्वाराने जबरदस्तीने हिसकावून नेले.

विमल निरंजन सुकळकर (वय ७५ रा. राठीनगर) असे तक्रारकत्र्या वृद्धेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर वृद्ध महिला सकाळीच घरापासून काही दूर अंतरापर्यंत फिरण्यासाठी गेली होती. वृद्धा एकटी व बेसावध असल्याचे बघून पाळत ठेवून असलेल्या दुचाकीस्वाराने स्वत:च्या चेहरा पांढऱ्या रंगाच्या दुपट्ट्याने झाकला होता. त्याने वृद्धेजवळ येऊन गळ्यातील १२ ग्रॅम सोन्याची चेन, १ ग्रॅमचा पेंडाल असे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. वृद्धा दुचाकीस्वाराचा प्रतिकार सुद्धा करु शकली नाही. सकाळच्या सुमारास घटना घडल्याने कुणी त्या महिलेच्या मदतीसाठी धावून आले नाही. 

गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन

सदर घटनेची तक्रार वृद्धेने गाडगेनगर ठाण्यात दाखल केली. प्रकरणी पोलिसांनी पसार दुचाकीस्वाराविरुद्ध जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. अडीच ते तीन महिन्याच्या लॉकडाऊन काळात पोलिस सकाळपासून रस्त्यावर राहत होते, त्यामुळे शहरात अशा स्वरूपाची घटना घडली नव्हती. परंतु लॉकडाऊन शिथिल होताच असे गुन्हे घडत असल्याचे दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chain snatching at amaravati