गरीब विद्यार्थ्यांना आता इंग्रजी माध्यमातून घेता येणार शिक्षण; पुढील वर्षापासून मनपाच्या इंग्रजी शाळा

राजेश प्रायकर
Wednesday, 17 February 2021

पंधरा वर्षांपासून महापालिकेच्या १०० शाळा बंद झाल्या आहेत. यातील ३५ इमारतींचा उपयोग इंग्रजी शाळांसाठी केला जाणार असल्याचे शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने नमुद केले. या शाळांसाठी महापालिकेला वर्षाला २.६६ कोटींचा खर्च येणार आहे.

नागपूर : महापालिकेने पुढील शैक्षणिक वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी पाऊले उचलली आहे. महापालिकेचा शिक्षण विभाग आकांक्षा फाऊंडेशनसोबत करार करणार आहे, सहा विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनाही आता इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे शक्य होणार आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांनी नेहमीच प्रतिभेचे दर्शन घडविले. मुलांमध्ये प्रतिभा असूनही केवळ गरिबीमुळे अनेक पालक पाल्यांना इंग्रजी शाळांमध्ये दाखल करू शकत नाही. मात्र, महापालिकेने आता प्रतिभावान मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

अधिक वाचा - लग्नासाठी वर-वधू होते तयार; मंगलाष्टक सुरू असतानाच झाले सर्वकाही शांत; वधूपक्षावर ओढवली नामुष्की

पालिकेच्या शिक्षण विभागाने आकांक्षा फाऊंडेशनसोबत करार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून, स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी पाठविला आहे. या शाळांसाठी आकांक्षा फाउंडेशन ३० टक्के खर्च करणार असून महापालिका पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रस्तावात नमुद आहे. सहा विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक अशा एकूण सहा शाळा पुढील शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यात येणार आहे.

पंधरा वर्षांपासून महापालिकेच्या १०० शाळा बंद झाल्या आहेत. यातील ३५ इमारतींचा उपयोग इंग्रजी शाळांसाठी केला जाणार असल्याचे शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने नमुद केले. या शाळांसाठी महापालिकेला वर्षाला २.६६ कोटींचा खर्च येणार आहे.

जाणून घ्या - Fastag Update : फास्टॅग असूनही भरावा लागला दुप्पट टोल, वाचा काय आहे कारण; टोल नाक्याबाहेर थाटली दुकाने

परंतु, यातून झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचे व्यासपीठ खुले होणार आहे. खासगी इंग्रजी शाळांचे शुल्क भरण्याची क्षमता नसलेल्या पालकांनाही आपल्या मुलांना या शाळांमध्ये दाखल करता येणार आहे. अनेक पालकांनी महापालिकेकडे इंग्रजी शाळांची मागणी केली होती.

विधानसभानिहाय एक इंग्रजी शाळा

उत्तर नागपूर नारा प्राथमिक शाळा
पूर्व नागपूर बाबुळबन मराठी प्राथमिक शाळा
दक्षिण-पश्चिम नागपूर स्वर्गीय बाबुरावजी बोबडे मराठी प्राथमिक शाळा
पश्चिम नागपूर रामनगर मराठी शाळा
दक्षिण नागपूर रामभाऊ म्हाळगी मराठी प्राथमिक शाळा
मध्य नागपूर ः स्वर्गीय गोपाळराव मोटघरे हिंदी उच्च माध्यमिक शाळा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporations English school from next year