लग्नासाठी वर-वधू होते तयार; मंगलाष्टक सुरू असतानाच झाले सर्वकाही शांत; वधूपक्षावर ओढवली नामुष्की

Punishment by Nagpur municipal corporation for finding more people in marriage
Punishment by Nagpur municipal corporation for finding more people in marriage

नागपूर : निर्धारित संख्येपेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आल्याने महापालिकेने वधू पक्षासह मंगल कार्यालयावरही प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला. नुकताच महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जास्त वऱ्हाडी आढळल्यास मंगल कार्यालय, लॉन सील करण्याचे निर्देश दिले होते.

राज्य सरकारने कोरोना काळात मंगल कार्यालय, लॉनसाठी दिशानिर्देश दिले आहे. मिशन बिगिन अगेनअंतर्गत यात आता शिथिलता देण्यात आल्याने सद्यःस्थितीत मंगल कार्यालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत समारंभाला परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, अनेकजण या अटींचेही उल्लंघन करीत आहेत. शहरात काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने आयुक्तांनी मंगल कार्यालये व लॉनचालकांना अटीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. याशिवाय क्षमतेपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती आढळून आल्यास लॉन, मंगल कार्यालये सील करण्याचे निर्देश उपद्रव शोध पथकाला दिले आहे. 

धंतोली झोनमधील रिंग रोडवरील नरेंद्रनगरातील तुकाराम सभागृहात अटीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. सभागृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त वऱ्हाडी लग्न समारंभात दिसून आले. त्यामुळे उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वातील पथकाने तुकाराम सभागृहाचे संचालक आणि वधू पक्षाकडील मंडळींवर प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

वाढत्या बाधितांमुळे महापालिका कठोर

मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार प्रथमच मंगल कार्यालयावर कारवाई करण्यात आली. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मनपाने कठोर पाऊल उचलण्यास सुरवात केली आहे. यापुढे कोणत्याही मंगल कार्यालयात कोरोना अटी, नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रारंभी कडक कारवाईसह नंतर संबंधित मंगल कार्यालय बंद करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com