पती-पत्नीने घेतले विष आणि...

poison
poison

नागपूर : आर्थिक परिस्थितीसमोर अनेक जण हतबल होतात. त्यामुळे जीवन नकोसे होऊन अत्यंत टोकाची भूमिका घेण्याच्या निर्णयाप्रत पोहचतात. बिनाकी मंगळवारी परिसरातील वीजबिल संकलन केंद्राच्या संचालकाने पत्नीसह विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जितेंद्र दुरुगकर आणि सपना दुरुगकर असे या दाम्पत्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. जितेंद्र दुरुगकर वीज संकलन केंद्र चालवत असत, अशी माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगरमधील जैन मंदिराजवळ राहणारे जितेंद्र दुरुगकर यांनी मंगळवारी पत्नी सपनासमवेत विष प्राशन केले. दोघांनाही मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे दुरुगकर दाम्पत्य मृत्यूशी झुंज देत आहे. जितेंद्र हे सुमारे 25 वर्षांपासून वीजबिल संकलन केंद्र चालवीत होते. त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, महावितरण कंपनीने जितेंद्र दुरुगकर यांना जवळपास 4 महिन्यांपासून कमिशन दिले नव्हते. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत झाली होती. त्यामुळे त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचे वेतनही द्यायला पैसे नव्हते. आर्थिक चणचणीमुळे त्रस्त झालेल्या जीतेंद्र यांची घरीही चिडचिड होत होती. त्यामुळे घरातील वातावरणही बिघडले. खिळखिळ्या झालेल्या आर्थिक अवस्थेमुळे जितेंद्र यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

पती-पत्नीने आत्महत्या करून जीवन संपवून टाकण्याची तयारी केली. दोन्ही मुलांना वेगवेगळ्या खोलीत ठेवून दोघांनीही विष प्राशन केले. दोघेही बेशुद्धावस्थेत असतानाच मुलांचा ओरडण्याचा आवाज जितेंद्र यांच्या भावाला आला. त्यांनी लगेच घराकडे धाव घेतली. प्रकार लक्षात येताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने सपना आणि जितेंद्र यांना रूग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न करून दोघांचाही जीव वाचविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com