नागपूर : कोरोना प्रादूर्भावाच्या धास्तीने प्रत्येक जण चिंतित आहे. लॉकडाऊननंतर व्यवहार सुरू झाले असले तरी अर्थचक्राला गती मिळालेली नाही. कोरोनामुळे गेल्या 100 दिवसात देशातील किरकोळ व्यापाऱ्यांचे तब्बल साडेपंधरा लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. "अनलॉक' ला 45 दिवस झाले असले तरी अद्यापही व्यापार स्थिरावलेला नाही. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे.
कोरोनाच्या भीतीने ग्राहकांनीही बाजाराकडे पाठ फिरविल्याने कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अवघड झाल्याचे चित्र आहे. देशातील किरकोळ व्यापारी कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे प्रथमच सर्वात कठीण काळातून जात आहे. या व्यापाऱ्यांवर सर्वच स्तरातून वाईट परिणाम होतो आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी सरकारने पुढाकार न घेतल्यास देशातील 20 टक्के दुकाने बंद होतील. देशातील बेरोजगारांची संख्येत झपाट्याने वाढेल, अशी भीती अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी व्यक्त केली.
देशात एप्रिल महिन्यात पाच लाख कोटी, "मे'मध्ये साडे चार लाख कोटी, जूनमध्ये चार लाख कोटी आणि 15 जुलैपर्यंत 2 लाख 50 हजार कोटींच्या व्यवसायाचे नुकसान झाले. कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकही घाबरलेले आहेत. त्यामुळे स्थानिक ग्राहकही बाजारात खरेदीसाठी येण्यास इच्छुक नाहीत. शेजारील राज्य आणि शहरातील खरेदीदारही कोरोनाच्या भीतीमुळे दुसऱ्या शहरात जाणे टाळत आहे. तसेच आता तर जिल्हा व राज्य बंद आहेत.
परिवहन सुविधाही बंद असल्याने खरेदीदारांनीही बाजारांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे देशातील किरकोळ व्यापाऱ्यांचे अर्थचक्र पूर्णपणे विस्कटले आहे. केंद्र व राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज घोषित न केल्यानेही त्याच्यावरील आर्थिक संकट अधिकच गडद झाले. देशातील सर्वच बाजारात सन्नाटा असल्याने व्यापारीही सायंकाळी पाच वाजताच दुकाने बंद करून घर जवळ करू लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनलॉकनंतरच्या कालावधीतही फक्त दहा टक्केच ग्राहक बाजारात खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळेही व्यापाऱ्याचा व्यवसाय पूर्णपणे प्रभावीत झालेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अद्याप व्यापाऱ्यांसाठी कोणतेही पॅकेज जाहीर केलेले नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना सशक्तपणे उभे राहणे सध्यातरी कठीणच आहे.
विशेष मुदत मिळावी
सध्या सर्वच जण मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना भयंकर आर्थिक झळा बसत असल्या तरी व्यापाऱ्यांची स्थितीही बरी नाही. व्यापाऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अर्थ मंत्रालयाने पुढाकार घेणे काळाची गरज आहे. तसेच व्यापाऱ्यांना करात सूट, बॅंक कर्ज, मासिक हप्त्ये भरण्यासाठी विशेष मुदत द्यायला हवी. या कालावधीत कोणतेही व्याज न आकारता दंडही आकारण्यात येऊ नये. बी. सी. भरतीया, अध्यक्ष, अखिल भारतीय व्यापारी महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.