हीच का 'शिव'सेना? गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्याला दिले शहरप्रमुखपद

Criminal backgrounded Mangesh Kadav has shiv sena city chief
Criminal backgrounded Mangesh Kadav has shiv sena city chief

नागपूर : शिवसेनेचा माजी शहरप्रमुख मंगेश कडव मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. प्रॉपर्टी डिलर व दाम्पत्याला खंडणी मागितल्यानंतर तो चर्चेत आला होता. यामुळे शिवसेनेच्या कार्यकारिणीवर संशय व्यक्‍त करण्यात आल्याने पक्षात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांकडून अटकेच्या भीतीमुळे मंगेश अद्याप फरार आहे. वाद वाढत असल्याचे बघून पक्षाने कडव याची हकालपट्टी केली. आता प्रश्‍न उपस्थित होतो की, गुन्हेगारी जगतात सक्रिय असलेल्या मंगेशला शिवसेनेचे शहरप्रमुखपद दिलेच कसे... यामुळे हीच का 'शिव'सेना, असा प्रश्‍न नागरिक एकमेकांना विचारत आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश कडव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. 2003 पासून गुन्हेगारी जगतात सक्रिय आहे. तो छोट्या टोळ्या बनवून गुंडगिरी करीत होता. टोळीचा प्रमुख असल्यामुळे तो वाटमारी व लूटमार करीत होता. मात्र, काही कालावधितच तो मोठमोठ्या प्रॉपर्टीवर कब्जा मारणे, खंडणी वसूल करणे, हप्ता वसुली करणे, तीष्ण हत्यार दाखवून दमदाटी करण्यापर्यंत हिंमत करीत होता.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असतानाही शिवसेनेने त्याची शहरप्रमुखपदावर नियुक्‍ती केली. शिवसेनेचा शहरप्रमुख बनल्यानंतर तो अनेकांना जमीन, भूखंड आणि फ्लॅट विकण्याच्या नावावर लाखोंनी फसवणूक करीत होता. काही पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने आतापर्यंत अनेकांची फसवणूक केली आहे. शिवसेनेच्या एवढ्या मोठ्या पदावर असल्यामुळेच मंगेशने कोटींची खंडणी आणि लाखोंची वसुली केली होती.

मंगेश कडव याच्यावर आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. यापैकी पाच गुन्हे नुकतेच दाखल झाले, तर सात गुन्हे जुने आहेत. मंगेशवर आणखी जवळपास 12 गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडवला अटक करण्यासाठी अनेक ठिकाणी छापे घातले आहेत. मात्र, तो गुंगारा देत आहे. पोलिसांनी कडवची लक्‍झरी कार जप्त केली आहे. ही कार मंगेशची पत्नी रुचिताच्या बहिणीच्या घरातून जप्त केली आहे. यापूर्वी पोलिसांनी मंगेशच्या तीन महागड्या कार जप्त केल्या आहेत.

कोट्यवधींच्या संपत्तीचे दस्तऐवज जप्त

आतापर्यंत पोलिसांनी मंगेश कडवच्या घरातून कोट्यवधींचा दस्तावेज जप्त केल्याची माहिती आहे. यामध्ये काही वादग्रस्त प्रॉपर्टीचा समावेश आहे. अनेक स्टॅंपपेपर आढळले असून, त्यावर वादग्रस्त प्रॉपर्टीचे व्यवहार आहेत. कडवने शिवसेनेच्या नावावर जमा केलेली खंडणी आणि वसुलीचा पैसा पोलिस जप्त करणार आहेत. सध्या कडव हा अंडरग्राउंड झाला आहे.

सुपारी व्यापाऱ्यांकडून 50 लाखांची वसुली

शहरातील अनेक सुपारी व्यापाऱ्यांकडून विक्रम राठोड आणि संजोग राठोड हे दरमहिन्याला 50 लाखांची खंडणी वसूल करतात. पैसे देण्यासाठी टाळाटाळ केल्यास व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर अवैध छापा घालतात. मांडवली केल्यास सोडून देतात नाही तर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून कारवाई करण्यास भाग पाडतात, अशी माहिती विक्रमसोबत काम करणाऱ्या एका शिवसैनिकाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com