लुटमार करणारी टोळी जेरबंद, तहसील पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

Friday, 25 September 2020

शुभम राजेश भगत (वय २३,रा.ओमनगर), मनीष ऊर्फ गोलू हरिओम चौहान (वय २५,रा.खामला), मोहम्मद इम्तेयाज मोहम्मद सुबराती (वय ३२,रा. नंदनवन झोपडपट्टी) व राहुल ऊर्फ बटल्या शिवपाल बहादुरे (वय ३२,रा. वर्धा),अशी अटकेतील लुटारूंची नावे आहेत.

नागपूर : चाकूने हल्ला करून लोको पायलट सचिनकुमार राधेलाल वर्मा ( वय ३४, रा. बालाजी वॉर्ड, बल्लारशा) यांना लुटणाऱ्या टोळीतील चौघांना तहसील पोलिसांनी अटक केली.

शुभम राजेश भगत (वय २३,रा.ओमनगर), मनीष ऊर्फ गोलू हरिओम चौहान (वय २५,रा.खामला), मोहम्मद इम्तेयाज मोहम्मद सुबराती (वय ३२,रा. नंदनवन झोपडपट्टी) व राहुल ऊर्फ बटल्या शिवपाल बहादुरे (वय ३२,रा. वर्धा),अशी अटकेतील लुटारूंची नावे आहेत. त्यांचा साथीदार अकबर अली ऊर्फ कालू रेहमान अली हा फरार आहे. 

१४ सप्टेंबरला मध्यरात्री गार्डलाइन परिसरात चाकूने हल्ला करून लुटारूंनी वर्मा यांच्याकडील रोख व मोबाइल हिसकावला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व
 

तहसील पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक संजय दुबे, हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण शेंडे, समीर शेख, प्रमोद, किशोर यांनी लुटारुंचा शोध सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे चौघांना अटक केली. या टोळीकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
 

मोटारसायकल चोरांना अटक

तहसील पोलिसांनी दोन मोटरसायकल चोरांना अटक केली. इमरान ऊर्फ सानू खान बिलावल खान (वय २५, रा. बंदे नवाजनगर) व प्रकाश ऊर्फ पक्या विनोद मानवटकर (वय २२ रा. वनदेवीनगर),अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. १६ सप्टेंबरला फुटबॉल मैदान परिसरातून ऐफाज अली निसार अली याची मोटरसायकल चोरी गेली. याप्रकरणी तहसील पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. दोघांना अटक केली. दोघांकडून दोन मोपेड व मोटरसायकल जप्त केल्या. या दोघांकडून वाहन चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminals gang arrested by tahasil police