जैसी करनी वैसी भरनी...कंत्राटदार कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

शहरात पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. सिमेंट रस्ते तयार झाल्यानंतर काही महिन्यांमध्येच सिमेंट रस्त्यांना तडे गेल्याचेही अनेकदा पुढे आले. जनमंचने अनेकदा सिमेंट रस्त्याचे वास्तव पुढे आणले. महापालिकेत जनमंचच्या तक्रारी, निवेदनाची अनेक कागदे जमा झाली. परंतु त्यात पुढे काहीही झाले नाही. आता महापालिकेच्या प्रयोगशाळेनेच सिमेंट रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेले आय-ब्लॉक निकृष्ट असल्याचा अहवाल देत कंत्राटदार तसेच मनपा अभियंत्यांचे पितळ उघडे पाडले.

नागपूर : शहरातील सिमेंट रस्ते दोषपूर्ण असल्याचे आरोप अनेक संघटनांनी केले आहेत. विविध संघटनांच्या कारवाईच्या मागणीवर अनेक वर्षे धूळ बसली. आता मात्र प्रयोगशाळेनेच सिमेंट रस्त्याच्या बाजूने लावण्यात आलेले आय-ब्लॉक मानकाप्रमाणे नसल्याचा अहवाल दिला आहे. एवढेच नव्हे तर सिमेंट रस्त्यांचा 'क्‍युरिंग पिरियड' संपुष्टात येण्यापूर्वीच आय-ब्लॉक बसविल्याने कंत्राटदारांची दिरंगाईही उघडकीस आली आहे.

शहरात पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. सिमेंट रस्ते तयार झाल्यानंतर काही महिन्यांमध्येच सिमेंट रस्त्यांना तडे गेल्याचेही अनेकदा पुढे आले. जनमंचने अनेकदा सिमेंट रस्त्याचे वास्तव पुढे आणले. महापालिकेत जनमंचच्या तक्रारी, निवेदनाची अनेक कागदे जमा झाली. परंतु त्यात पुढे काहीही झाले नाही. आता महापालिकेच्या प्रयोगशाळेनेच सिमेंट रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेले आय-ब्लॉक निकृष्ट असल्याचा अहवाल देत कंत्राटदार तसेच मनपा अभियंत्यांचे पितळ उघडे पाडले.

सविस्तर वाचा - महापौर संदीप जोशींसह वीस जणांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

सिमेंट रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील एकस्तंभ चौक ते उत्तर अंबाझरी हा सिमेंट रस्ता जे. पी. इंटरप्रायजेस या कंत्राटदार कंपनीने तयार केला. या रस्त्यावरील आय-ब्लॉक मानकाप्रमाणे नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. 'क्‍युरिंग पिरियड' पूर्ण होण्यापूर्वीच आय ब्लॉक लावण्यात आल्याचेही अहवालात स्पष्ट आहे. निकृष्ट कामाबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज कंत्राटदार जे. पी. इंटरप्राईजेस, क्वालिटी कंट्रोलचे काम पाहणारी क्रिएशन इंजिनिअर्ससह पालिकेचे कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. आयुक्तांनी दोन्ही कंपन्यांना तीन दिवसांत बाजू मांडण्याची संधी दिली. समाधानकारक उत्तर न दिल्यास कंपनीस काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशाराही दिला. पालिकेचे कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांना 24 तासांत स्पष्टीकरण मागितले आहे.

बांधकामातील अनियमितता पुढे येणार
सिमेंट रस्त्यांवरून आयुक्तांनी आता कंत्राटदार कंपन्यांवर कारवाई सुरू केल्याचे चित्र आहे. शहरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सिमेंट रस्ते बांधकामातील अनियमितताही यानिमित्त पुढे येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: currption by contracter in cement road contract