जर्मनीतील कार्ल्सरूहच्या महापौरांचा सायकलने मेट्रो स्टेशनवर फेरफटका

Cycle of the Mayor of Karlsruhe in Germany tours the metro station
Cycle of the Mayor of Karlsruhe in Germany tours the metro station

नागपूर : जर्मनीतील कार्ल्सरूह शहराचे महापौर डॉ. फ्रॅंक मेंट्रो यांनी आज सीताबर्डी ते एअरपोर्ट स्टेशनपर्यंत मेटोतून प्रवास केला. त्यांनी एअरपोर्ट स्टेशनवर सायकलनेही फेरफटका मारला. त्यांनी निर्धारित वेळेपूर्वी मेट्रो सुरू झाल्याबाबत महामेट्रो प्रशासनाचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांच्या शहरात अनेक वर्षांपासून मेट्रो प्रकल्प पूर्ण न झाल्याची खंतही व्यक्त केली.


जर्मनीच्या कार्ल्सरूह शहरातील उच्च पदस्थ प्रतिनिधी मंडळ महापौर डॉ. फ्रॅंक यांच्या नेतृत्वात कालपासून नागपुरात आले आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास शिष्टमंडळाने सीताबर्डी इंटरचेंज ते एअरपोर्टपर्यंत प्रवास केला. एअरपोर्ट स्थानकावरील राष्ट्रपिता महात्मा गांधींची कुटी तयार करण्यात आली. येथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी स्थानकावरील संपूर्ण सोयीचा त्यांनी आढावा घेतला. या स्थानकावरील फीडर सर्व्हिसेस म्हणजे इ-सायकल, इ-बाईक चालविण्याचाही आनंद त्यांनी लुटला. येथून परतीच्या मेट्रो प्रवासात त्यांनी नागपूरकर प्रवाशांसोबत गप्पा मारल्या. मेट्रोने प्रवास करताना पूलावरून दिसणारे शहराचे मनोरम दृश्‍य बघून ते आनंदित झाले. भविष्यात सोयीने प्रवास करायचा असेल आणि रहदारीच्या समस्या टाळायच्या असतील तर मेट्रोसारख्या सार्वजनिक परिवहनासारख्या विकासाची गती वाढवायला हवी. शहरातील लोकांच्या स्वास्थाच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने हवामान बदल, प्रदूषण, आरोग्यासाठी उपयुक्त अशी नागपूर मेट्रो शहरासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे असे ते म्हणाले. कार्ल्सरूह या शहरात 2010 पासून 3.5 किमी अंतराच्या भूमिगत मेट्रो बनविण्याचे काम सुरू झाले. परंतु, ते अजूनही कामेच सुरू असून तेथील नागरिक मेट्रोच्या प्रतीक्षेत आहे. नागपुरात मात्र मेट्रोने अवघ्या चार वर्षांत 38 किमीपैकी निम्मे किमीचा मार्ग सुरू केला. शहरात दोन मार्गिकेवर मेट्रो धावायलादेखील लागली आहे हे अचंबित करणारे आहे, अशा शब्दात महापौर डॉ. फ्रॅंक यांनी महामेट्रोचे कौतुक केले. या दौऱ्यात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, महामेट्रोचे सुधाकर उराडे, महेश गुप्ता तसेच स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.


महापालिकेत आयुक्तांची घेतली भेट

डॉ. फ्रॅंक यांनी महापालिकेत आयुक्ता तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. त्यांनी नागपूर शहरात कार्ल्सरूह शहरातील वाहनविरहित वाहतूक व्यवस्थेअंतर्गत "पब्लिक बाईक सिस्टीम' प्रकल्प सुरू करण्याबाबत चर्चा केली. यावेळी स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे व डॉ. फ्रॅंक यांच्यासोबत आलेले अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी त्यांना शहरातील विविध प्रकल्पांची माहिती दिली. पब्लिक बाईक सिस्टीम प्रकल्प महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com