
नागपूर : रसायनविरहित रंग आणि हाताने केलेले बारीक नक्षीदार काम, अशा एकाहून एक सुंदर कलाकृतींचे दर्शन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात सुरू असलेल्या मृगनयनी प्रदर्शनात नागपूरकरांना होत आहे. कलाकृतींमध्ये, सुवर्णधाग्यांनी बनविलेली महाराणी माहेश्वरींची दोन लाखांची डिझायनर साडी आणि दुर्मीळ रत्नजडित अशा मूर्ती खास आकर्षण ठरल्या आहेत.
अवश्य वाचा - लठ्ठ आहात का? मधुमेहसुद्धा आहे?
मृगनयनी मध्य प्रदेश हस्तशिल्प आणि हातमाग विकास निगम व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने मृगनयनी मध्य प्रदेश प्रदर्शन नागपुरात आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात मध्य प्रदेशातील पारंपरिक कलाकृतींना आकार देणाऱ्या कलावंतांचे वंशज त्यांच्या कलाकृतींसह सहभागी झाले आहेत. त्यात नवाब पतौडी यांची नात, "पाकीजा' चित्रपटात मीनाकुमारीने धारण केलेली चंदेरी साडी बनविणारे कलावंत, महाराणी अहल्याबाई होळकर यांनी प्रोत्साहन दिलेल्या माहेश्वरी कलाकृतीच्या कारागिरांचे वंशज आणि अन्य अनेक व्यक्तिगत तसेच घरादाराला सौंदर्याने नटविणाऱ्या वस्तू सादर झाल्या आहेत. त्यात हस्तकौशल्याने बनिवलेल्या बॅग, पर्स, साड्या, खेळण्याच्या वस्तू आदींचा समावेश आहे. यात सहभागी कलावंतांपैकी अनेक कलावंतांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
नातू हमीद उल्ला खान नवाब पतौडी यांच्या नात फिरोजा-अफरोज या पिशव्या घेऊन आल्या आहेत. यासोबत दालिम्बी आणि अनारी गुलाबी या माहेश्वरी साड्यांचे कारागीर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त अहमद हुसेन अन्सारी यांनी या साड्यांचा स्टॉल लावला आहे. ही या कारागिरीची सातवी पिढी आहे. यासोबतच "पाकीजा' चित्रपटात मीनाकुमारी यांनी "इन्हीं लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा...' या गाण्यात वापरलेला दुपट्टा, चित्रपटासाठी वापरण्यात आलेल्या साड्या यासह अभिनेत्री विद्या बालन यांच्याकडे असलेल्या हुबेहूब साड्याही अब्दुल हकीम खलिफा यांनीही नागपूरकरांसाठी आणल्या आहेत.
प्रदर्शनात बुद्ध, कृष्ण, महादेवाच्या मूर्ती सादर करण्यात आल्या आहेत. बुद्धाच्या मूर्तीच्या पाठमोऱ्या भागात बुद्धाच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंतचा चित्रमय इतिहास साकारण्यात आलेला आहे. यासोबतच कृष्ण, महादेवाच्या मूर्तींच्या पाठमोऱ्या भागात वेगवेगळ्या कलाकृतींचे दर्शन होते.
भोपाळ येथील सुरेखा यादव यांनी ज्यूट बॅगचा व्यवसाय भोपाळमध्ये सुरू केला आहे. या माध्यमातून त्यांनी भोपाळमधील ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. भोपाळ गॅस गळतीमध्ये मृत पावलेल्या कुटुंबातील हजारो निराधार महिलांना सुरेखा यांनी ज्यूट बॅगचे नि:शुल्क प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ज्यूट बॅगमध्ये नैसर्गिक रंग आणि फळांचे ठसे, महाराष्ट्रीय कलासंस्कृतीचा वापर करण्यात आला आहे.
व्यापर हा उद्देश नव्हे
मृगनयनी प्रदर्शनाचा उद्देश व्यापार करणे नसून, देशभरातील कलाकारांना प्रोत्साहित करणे हा आहे. यंदा प्रदर्शनाचे 27 वे वर्ष आहे. नागपूरकरांनी दरवर्षी आम्हाला चांगला प्रतिसाद दिल्याने भारतातील पहिले मृगनयनीचे शोरूम नागपूरमध्ये सुरू करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी जागेची पाहणी झाली आहे. लवकरच मृगनयनी शोरूममार्फत देशभरातील कलाकृती नागपूरकरांसाठी खुली होणार आहे.
-एम. एल. शर्मा, व्यवस्थापक, मृगनयनी प्रदर्शन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.